नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान
निफाड: पुढारी वृत्तसेवा : निफाडसह तालुक्यातील उत्तर भागात उगांव, शिवडी खॆडे, नांदुर्डी, थेटाळे भागात आज (दि.२६) दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी द्राक्षबागांच्या मणीसेटींग तसेच फुलोरा अवस्था होत्या. मुसळधार पावसासह जोरदार गारा झाल्यामुळे मणीगळ झाली आहे. शिवाय तयार झालेल्या द्राक्षमण्यांना चिरा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील पिकांसह जनावरांचा चारा जोरदार वाऱ्याने जमीनदोस्त झाला आहे.
केवळ पंचनाम्याचा फार्स नको
निफाड तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे केवळ पंचनामे न करता भरपाई त्वरीत व नुकसानीच्या तुलनेत दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केली आहे.
हेही वाचा
नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू
नाशिक : आईच्या फ्लॅटवर मुलगा व सुनेचा कब्जा, गुन्हा दाखल
नाशिककरांचे पाणी महागणार, नवीन आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
The post नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.
निफाड: पुढारी वृत्तसेवा : निफाडसह तालुक्यातील उत्तर भागात उगांव, शिवडी खॆडे, नांदुर्डी, थेटाळे भागात आज (दि.२६) दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागांच्या मणीसेटींग तसेच फुलोरा अवस्था होत्या. मुसळधार पावसासह जोरदार गारा झाल्यामुळे मणीगळ झाली आहे. शिवाय तयार झालेल्या द्राक्षमण्यांना चिरा गेल्याने …
The post नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.