प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबर २०२३ … The post प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी appeared first on पुढारी.
#image_title

प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबर २०२३ ला मुंबईत संपन्न होणार आहे.
संबंधित बातम्या 

मंगेश देसाई- स्मिता तांबेचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ ओटीटीवर (video)
‘गाथा नवनाथांची’ कलाकारांनी घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीचे दर्शन
Randeep Hooda Wedding : अभिनेता रणदीप हुड्डा अडकणार लग्न बंधनात

पहिल्यांदाच एकत्र सूत्रसंचलन करण्याचा आनंद प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे या दोघांनीही व्यक्त केला. या दोन्ही कलाकारांचा हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व याद्वारे अचूक टायमिंग साधणारे प्रसाद आणि श्रेया सूत्रसंचलनाची बॅटिंग ही दमदार करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

छोट्या पडद्यावर आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारासाठी ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तर मालिका विभागात ‘रमा राघव’,’भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका स्पर्धेत आहेत.
The post प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबर २०२३ …

The post प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी appeared first on पुढारी.

Go to Source