महावीर जयंती निमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाणे, टपाल तिकीट जारी

महावीर जयंती निमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाणे, टपाल तिकीट जारी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान मोदी यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने आज (दि.२१) दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात विशेष नाणे आणि मुद्रांक जारी केले. २५५० व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.
जैन धर्माचे २४वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडपममध्ये आयोजित भगवान महावीर निर्वाण महोत्सवात पंतप्रधान मोदी उपस्थित होते. यावेळी जैन गुरु, जैन साध्वी यांच्यासह हजारो जैन बांधव देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विशेष नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत मंडपम आज भगवान महावीरांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवाचा साक्षीदार आहे, महावीर जयंतीनिमित्त मी देशातील जनतेला शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या धामधुमीत अशा कार्यक्रमाचा भाग होणे म्हणजे दिलासादायक आहे.” तसेच विकसित भारत बनवण्यासाठी भगवान महावीर यांचे संदेश अत्यंत गरजेचे असल्याचे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

#WATCH | PM Narendra Modi releases a commemorative stamp and coin at the inauguration of the 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav, on the occasion of Mahavir Jayanti at Bharat Mandapam.#MahavirJayanti pic.twitter.com/MRscKfDzzN
— DD India (@DDIndialive) April 21, 2024

हेही वाचा : 

हजारो मतदार मतदानापासून वंचित, जबाबदार कोण? : कृष्णा खोपडेंचा भाजपला घरचा आहेर  
अमरावतीत ‘वंचित’ची बंडखोरी; पक्षादेश धुडकावत जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा
नागपूर: पीएम मोदींनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांकडून ‘मन की बात’