जळगावात भर दिवसा तरुणाचा निर्घृण खून!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिंनिंगच्या मागे एका परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना आज (दि. २०) उघडकीस आली. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगच्या मागे असलेल्या शेतामध्ये जिनिंग असून. येथे काम करणार्‍या सुरेश सोलंखी (मूळ रा. सेंधवा मध्यप्रदेश ) या परप्रांतीय कामगाराचा तीक्ष्ण हत्याराने …

जळगावात भर दिवसा तरुणाचा निर्घृण खून!

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिंनिंगच्या मागे एका परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना आज (दि. २०) उघडकीस आली.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगच्या मागे असलेल्या शेतामध्ये जिनिंग असून. येथे काम करणार्‍या सुरेश सोलंखी (मूळ रा. सेंधवा मध्यप्रदेश ) या परप्रांतीय कामगाराचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना २० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पथक घटनांसाठी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि श्‍वास पथक घटनास्थळी दाखल झाले. भर दिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.