छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर दुचाकीचा आपघात; धडकेत पाच वर्षाचा बालक ठार, तीन गंभीर

कन्नड/ हतनूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर हतनूर पेट्रोल पंपाच्या समोर आज (दि. २०) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील पाच वर्षाचा कार्तिक प्रकाश जाधव (रा. लासूर) हा बालक अपघात स्थळीच ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी …

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर दुचाकीचा आपघात; धडकेत पाच वर्षाचा बालक ठार, तीन गंभीर

कन्नड/ हतनूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर हतनूर पेट्रोल पंपाच्या समोर आज (दि. २०) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील पाच वर्षाचा कार्तिक प्रकाश जाधव (रा. लासूर) हा बालक अपघात स्थळीच ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रमेश बाबुराव जाधव (वय ४० रा.लासूर) हे आपल्या एका नातलगांच्या लग्नासाठी कन्नड येथे आले होते. लग्नसमारंभ उरकून ते आपल्या मोटारसायकलने (क्र. एम. एच.०डी.ए.११६२) कन्नड येथून लासूर या गावी जाण्यासाठी निघाले होते. सोबत पुतण्या कार्तिक प्रकाश जाधव (वय ५), आई सुमनबाई बाबुराव जाधव (वय-६०), पत्नी रुपाली रमेश जाधव (वय- ३५) हे देखील होते. हतनूर पेट्रोलपंपासमोर अचानक हतनूरकडून छत्रपती संभाजीनगर दिशेने जात असलेल्या भरधाव ट्रॅक्टरने (क्र. एम. एच.२०एफयु) उजवीकडे यू टर्न घेतला. दरम्यान ट्रॕक्टर आणि ट्रॉलीच्यामध्ये मोटरसायकल धडकली. ही धडक एवढी जोरात होती की मोटरसायकलवरील रुपाली जाधव या हवेत उडून ट्रॅक्टर ट्रॉलीत फेकल्या गेल्या. कार्तिकच्या छातीला आणि पोटाला मार लागल्याने तो घटनास्थळीच गतप्राण झाला. रमेश जाधव, रुपाली जाधव, सुमनबाई जाधव (सर्व रा. लासूर गाव) यांच्या छाती व डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघातात मृत्यू पावलेल्या कार्तिकचे वडील प्रकाश बाबुराव जाधव यांचे एका वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. कार्तिकला ऋषी हा जुळा भाऊ देखील आहे. दोघे भाऊ नातलगाच्या लग्नासाठी कन्नड येथे आले होते. मात्र कार्तिक हा काका रमेश जाधव यांच्या मोटरसायकलवर बसून गावाकडे निघाला असताना अपघातात सापडला आणि त्याचा मृत्यू झाला.