Loksabha Election | पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला पुण्यात सभा..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 29 एप्रिलला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायं?ाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही माहिती दिली. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळमधून श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवीत आहेत. पंतप्रधान मोदी हे चारही उमेदवारांसाठीची एकत्रित सभा घेणार आहेत. सदाशिव पेठेतील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर या सभेचे नियोजन सुरू करण्यात आले. या सभेसाठी पंतप्रधानांसमवेत महायुतीचे अन्य मोठे नेतेही उपस्थित राहतील, असे घाटे यांनी सांगितले.
बारामतीमधील सभेची शक्यता मावळली
बारामतीत ’सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार’ अशी पवार कुटुंबातच अटीतटीची लढत होणार आहे. महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार आणि एकंदरीतच महायुतीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे पवार यांच्यासाठी पंतप्रधानांची बारामतीत सभा होईल, असे सांगण्यात येत होते. आता मात्र पुण्यात एकच सभा होणार असल्याने बारामतीमधील त्यांच्या सभेची शक्यता मावळली आहे.
हेही वाचा
भारतात वावरत होते महाकाय सर्प
अनपेक्षित संकटांसाठीची तयारी
शंभर कोटी वर्षांमध्ये प्रथमच एक झाले दोन जीव
