चंद्रावरील चिमूटभर धुळीला लिलावात मिळाली ‘इतकी’ रक्‍कम

वॉशिंग्टन : धूळही मौल्यवान असू शकते, असे म्हटले तर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. एखाद्याला कमी लेखायचे असेल तर अनेक लोक मोठ्या तोर्‍यात ‘तो माझ्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचाही नाही,’ असे म्हणत असतात! मात्र धुळीलाही मोठेच मोल येऊ शकते. जगातील सर्वात महागडी धूळही अशीच आहे. ही धूळ आपल्या पृथ्वीवरील नसून ती अन्य खगोलावरील आहे, असे म्हटल्यावर त्यामधील मर्म … The post चंद्रावरील चिमूटभर धुळीला लिलावात मिळाली ‘इतकी’ रक्‍कम appeared first on पुढारी.
#image_title
चंद्रावरील चिमूटभर धुळीला लिलावात मिळाली ‘इतकी’ रक्‍कम


वॉशिंग्टन : धूळही मौल्यवान असू शकते, असे म्हटले तर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. एखाद्याला कमी लेखायचे असेल तर अनेक लोक मोठ्या तोर्‍यात ‘तो माझ्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचाही नाही,’ असे म्हणत असतात! मात्र धुळीलाही मोठेच मोल येऊ शकते. जगातील सर्वात महागडी धूळही अशीच आहे. ही धूळ आपल्या पृथ्वीवरील नसून ती अन्य खगोलावरील आहे, असे म्हटल्यावर त्यामधील मर्म समजू शकते. या धुळीची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे. अर्थातच ती आहे चंद्रावरील!
चंद्रावरील चिमूटभर धुळीचा लिलाव न्यूयॉर्कच्या बोनहाम्समध्ये झाला होता. तिथे या धुळीला सुमारे 4 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती! विशेष म्हणजे लिलावाआधी या धुळीला आठ ते बारा लाख रुपये मिळतील असा अंदाज लावला होता. ही धूळ तीच आहे जी चंद्रावर उतरणारी पहिली व्यक्ती नील आर्मस्ट्राँगने तिथे पोहोचल्यावर उचलली होती. ‘अपोलो11’ शी संबंधित असल्याने ही धूळ ऐतिहासिक किमतीला विकली गेली.
या घटनेशी संबंधित असल्यामुळेच नव्हे तर एरवीही ती ‘चंद्रावरची’ असल्याने तिला महत्व आहेच. ती पृथ्वीवर आणणेही तितकेच खर्चिक काम असते. केवळ तीन देशांकडेच अशी चंद्रावरील धूळ आहे. अमेरिकेच्या ‘नासा’ने आपल्या अपोलो मोहिमांमधून चंद्रावरील धूळ व खडकांचे 382 किलो नमुने गोळा केले होते. तत्कालिन सोव्हीएट संघाने आपल्या तीन मोहिमांमध्ये केवळ तीनशे ग्रॅम धूळ गोळा केली होती. चीनही चंद्रावरील धूळ पृथ्वीवर आणणार्‍या देशांपैकी एक आहे. या देशाने चंद्रावरील धुळीचे तीन किलो नमुने आणले आहेत.
The post चंद्रावरील चिमूटभर धुळीला लिलावात मिळाली ‘इतकी’ रक्‍कम appeared first on पुढारी.

वॉशिंग्टन : धूळही मौल्यवान असू शकते, असे म्हटले तर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. एखाद्याला कमी लेखायचे असेल तर अनेक लोक मोठ्या तोर्‍यात ‘तो माझ्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचाही नाही,’ असे म्हणत असतात! मात्र धुळीलाही मोठेच मोल येऊ शकते. जगातील सर्वात महागडी धूळही अशीच आहे. ही धूळ आपल्या पृथ्वीवरील नसून ती अन्य खगोलावरील आहे, असे म्हटल्यावर त्यामधील मर्म …

The post चंद्रावरील चिमूटभर धुळीला लिलावात मिळाली ‘इतकी’ रक्‍कम appeared first on पुढारी.

Go to Source