राज्यव्यापी दौऱ्यामुळे दगदग; मनोज जरांगे-पाटील रूग्णालयात दाखल

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासण्या करून त्यांना किमान तीन दिवस रुग्णालयात ऍडमिट राहण्याचा सल्ला दिल्याने ते पुढील दोन तीन दिवस रूग्णालयात उपचार घेणार आहेत. Manoj Jarange -Patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे – … The post राज्यव्यापी दौऱ्यामुळे दगदग; मनोज जरांगे-पाटील रूग्णालयात दाखल appeared first on पुढारी.
#image_title

राज्यव्यापी दौऱ्यामुळे दगदग; मनोज जरांगे-पाटील रूग्णालयात दाखल

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासण्या करून त्यांना किमान तीन दिवस रुग्णालयात ऍडमिट राहण्याचा सल्ला दिल्याने ते पुढील दोन तीन दिवस रूग्णालयात उपचार घेणार आहेत. Manoj Jarange -Patil
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांनी सलग नऊ दिवस उपोषण केले होते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा करून ते नुकतेच अंतरवाली सराटीत परतले होते. या राज्यव्यापी दौऱ्यामध्ये ते रोज चार सभा घेत होते. या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी पंचेचाळीस ठिकाणी सभा घेतल्या. तसेच दोन ते अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला. सकाळी पहिली सभा नऊ वाजता ते घेत होते. तर शेवटची सभा रात्री उशिरापर्यंत म्हणजे रात्री एक ते दोन दरम्यान संपत असे. यादरम्यान त्यांची खूप धावपळ होत होती. अवेळी जेवण व अपुरा आराम यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. Manoj Jarange -Patil
तसेच अवघड असणारा रायगड किल्ला मनोज जरांगे- पाटील यांनी अनवाणी पायी चालत चढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून गड उतरतानाही त्यांनी रोपवेचा सहारा न घेता पायीच चालत गड उतरला. त्यामुळे शरीरावर प्रचंड ताण येऊन त्यांना अशक्तपणा जाणवत होता. सलग प्रवास, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सभा व समाजाच्या गाठी भेटी यामुळे पुरेसा आराम होत नव्हता. त्यामुळे प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याने आता किमान तीन दिवस तरी जरांगे पाटील रुग्णालयात राहून उपचार घेणार असल्याचे रूग्णालयाचे संचालक डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा 

मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा, ठाकरे गट करणार जंगी स्वागत
आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही ! : मनोज जरांगे
Manoj Jarange -Patil: सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील

The post राज्यव्यापी दौऱ्यामुळे दगदग; मनोज जरांगे-पाटील रूग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासण्या करून त्यांना किमान तीन दिवस रुग्णालयात ऍडमिट राहण्याचा सल्ला दिल्याने ते पुढील दोन तीन दिवस रूग्णालयात उपचार घेणार आहेत. Manoj Jarange -Patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे – …

The post राज्यव्यापी दौऱ्यामुळे दगदग; मनोज जरांगे-पाटील रूग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

Go to Source