पुढारी ऑनलाईन डेस्क : २६ नोव्हेंबर २००८ या दिवसाची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली. भारतासह संपूर्ण जगाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे थैमान लाईव्ह पाहिले तर काहींनी हा जीवघेणा थरार स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवला. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक, आलिशान हॉटेल्स आणि ज्यू सांस्कृतिक केंद्रावर एकाच वेळी झालेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. या हल्ल्यानंतर दहशतवादी कसाबला जिंवत जेरबंद करण्यात यश आले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या ९ वर्षांच्या चिमुरडीने न्यायालयात कसाबला ओळखले होते. आज २६/११चा स्मृतिदिन. जाणून घेवूया कसाबला न्यायालयात ओळखणारी साक्षीदार देविका रोटावन हिच्याविषयी…
रोटावन कुटुंबीय वांद्रे येथील झोपडपट्टीतील एका चाळीत राहत होते. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी देविका आपल्या वडील आणि भावासह छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर पुण्याला जाण्यासाठी आली होती. काही समजण्यापूर्वीच देविकाच्या कानी गाेळीबाराचा आवाज झाला. आजूबाजूला लोक मृतावस्थेत पडलेले तिला दिसले. देविकाही धावू लागली. यावेळी तिच्या उजव्या पायात एक गोळी घुसली. ती बेशुद्ध पडली. तिला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या पायावर सहा शस्त्रक्रिया झाल्या.
Mumbai 26/11 : सर्वात तरुण साक्षीदार… कसाबला ओळखणारी मुलगी…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील खटल्यात साक्ष देणारी देविका ही सर्वात तरुण साक्षीदार ठरली होती. न्यायालयातही तिने सर्व प्रश्नांची कोठेही विचलित न होता किंवा कोणतेही दडपण न घेता उत्तरे दिली होती. जून २००९ मध्ये एका विशेष न्यायालयात तिने कसाबला ओळखले. यानंतर माध्यमांमध्ये तिची ओळख ‘कसाबला ओळखणारी मुलगी’, अशी झाली हाेती. “न्यायालयात मी त्याच्याकडे बोट दाखवले. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मग त्याने खाली पाहिले,” असे तिने माध्यमांशी बाेलताना सांगितले होते. २१ नोव्हेंबर २०१२ राेजी कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आली होती.
Mumbai 26/11 : देविकाला पुन्हा शाळेत घेण्यासही झाला होता विरोध
वयाच्या ११ वर्षांपासून देविका नियमितपणे शाळेत जाण्यास सुरुवात केली. मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील साक्षीदार असणार्या देविकाच्या प्रवेशास शाळेने सुरुवातीला विरोध केला होता. तिच्यामुळे तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण होईल, अशी शंकाही उपस्थित केली गेली होती. आता या सर्व निराशाजनक आठवणी तिने मागे सोडल्या आहेत. आज देविका २५ वर्षांची आहे. रोटवन कुटुंबीय आता सांताक्रूझमधील निवासी इमारतीतील वनबीएचके फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाले आहे. आजपर्यंत तिने तिने दहशतवादी हल्ल्यात अनुभवलेला थरार अनेकवेळा टीव्ही शो, पॉडकास्ट आणि जाहीर सभांमध्येही शेअर केला आहे. आज तिच्या धाडसाचे कौतुक करणारी अनेक प्रमाणपत्रे तिच्याकडे आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या वर्षी मुंबईला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी देविकाची आवर्जून भेट घेतली होती.
सरकारकडून आश्वासन, पण…
२००६ मध्ये दीर्घ आजारामुळे देविकाच्या आईचा मृत्यू झाला. 26/11 हल्ल्यापूर्वी तिचे वडील सुका मेवा विक्रीचा व्यवसाय करायचे. मात्र आता देविकाच्या वैद्यकीय उपचारासाठी सातत्याने तिच्यासोबर र हॉस्पिटलमध्ये जावे लागल्याने त्यांनी आपल्या व्यवसायच थांबवला. देविकाला दोन मोठे भाऊ असून, एक कुटुंबासह पुण्यात राहतो, तर दुसर्याच्या पाठीच्या कण्यातील संसर्गामुळे दिव्यांग आहे.
देविका आहे नोकरीच्या शोधात
देविकाला आठ वर्षांत दोन टप्प्यांत फक्त 1.3 दशलक्ष रुपये सरकारी भरपाई मिळाली आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर तिला काही दिवस क्षयरोगाचा त्रास झाला त्यामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम झाला. आश्वासन दिलेल्या घरासाठी ती सरकारकडे पाठपुरावा करत आहे. एक खाजगी ट्रस्ट तिच्या कॉलेजची फी भरतो. देविका सध्या वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) च्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. सध्या स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती नोकरीच्या शोधात आहे.
26/11 हल्ल्याबाबत शनिवारी (दि.२५) ‘एएनआय’शी बोलताना देविकाने पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा थरार सांगितला. ती म्हणाली, मी माझ्या वडील आणि भावासह पुण्याला जाण्यासाठी सीएसटी रेल्वे स्टेशनवर गेले होते. काही मिनिटांमध्येच तेथे स्फोट झाला आणि अदाधूंद गोळीबार सुरु झाला. संपूर्ण रेल्वे स्टेशनवर लोक सैरावैरा धावू लागले. मी एका व्यक्तीला पाहिले. त्याच्या हातात मोठी बंदूक होती. तो अंदाधूंद गोळीबार करत होता. माझ्या पायाला गोळी लागली. मला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. माझ्यावर येथे दीड महिने उपचार झाले. यानंतर काही वर्ष माझ्यावर उपचार सुरुच होते.
#WATCH | Mumbai: Ahead of the 26/11 Mumbai terror attacks’ anniversary, Devika Rotawan says, “I was shot. My father, brother, and I were about to go to Pune… We went to CST railway station… Soon a blast was there, and firing started. People started running… I saw a person… pic.twitter.com/57uuxoAcls
— ANI (@ANI) November 25, 2023
हेही वाचा :
Mumbai terrorist attack : ‘असा’ झाला होता २६/११ चा हल्ला
26/11 Mumbai Attack : ४५ दिवस रिकाम्या शवागारावर पोलिसांचा पहारा, वाचा धक्कादायक खुलासा
The post “हाच तो दहशतवादी…” : कसाबला ओळखणारी ९ वर्षांची चिमुरडी आज काय करते? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : २६ नोव्हेंबर २००८ या दिवसाची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली. भारतासह संपूर्ण जगाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे थैमान लाईव्ह पाहिले तर काहींनी हा जीवघेणा थरार स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवला. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक, आलिशान हॉटेल्स आणि ज्यू सांस्कृतिक केंद्रावर एकाच वेळी झालेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. या हल्ल्यानंतर दहशतवादी कसाबला जिंवत …
The post “हाच तो दहशतवादी…” : कसाबला ओळखणारी ९ वर्षांची चिमुरडी आज काय करते? appeared first on पुढारी.