अजित पवारांपेक्षा सुनेत्रा पवारच श्रीमंत; 58 कोटींच्या मालकीण
पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार श्रीमंत असून शपथपत्रात दाखविलेल्या मालमत्तेत त्यांनी पतीला मागे टाकले आहे. सुनेत्रा पवार यांची मालमत्ता 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये आहे; तर अजित पवार यांची मालमत्ता 37 कोटी 15 लाख 70 हजार एवढी आहे. 2022-23 च्या आयकर विवरण पत्रानुसार अजित पवार यांचे उत्पन्न 80 लाख 76 हजार 200 रुपये इतके दाखविले आहे, तर सुनेत्रा पवार यांचे उत्पन्न 4 कोटी 22 लाख 21 हजार 110 इतके दाखविण्यात आले आहे. (Baramati LokSabha 2024)
Baramati LokSabha 2024: सुनेत्रा पवार यांची संपत्ती
जंगम मालमत्ता-12 कोटी 56 लाख 58 हजार
स्थावर मालमत्ता-58 कोटी 39 लाख 40 हजार
सोने-चांदी आभूषणे-75 लाखांवर
वाहने-एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर
शेतजमीन-44 एकर 22 गुंठे
ठेवी-2 कोटी 97 लाख 76 हजार 180
कर्ज-12 कोटी 11 लाख 12 हजार
अजित पवार यांची संपत्ती
एकूण उत्पन्न-4 कोटी 95 लाख 99 हजार 10
निवासी इमारत-37 कोटी 15 लाख 70 हजार
सोने-चांदी-आभूषणे 13 कोटी 25 लाख 6 हजार
वाहने-7 मूल्य : 75 लाख 75 हजार रुपये.
शेतजमिनीचे मूल्य-11 कोटी 29 लाख 20 हजार
ठेवी-2 कोटी 27 लाख 64 हजार 457
कर्ज-4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपये.
हे ही वाचा:
नागपूर : भागवत, गडकरी, फडणवीस, बावनकुळे, ठाकरे, बर्वे यांनी केले मतदान
Lok Sabha Elections 2024 first phase : महाराष्ट्रातील पाच तर देशातील १०२ मतदारसंघात आज मतदान, जाणून घ्या प्रमुख लढती
Lok Sabha Election 2024 – माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार : डॉ. अनिकेत देशमुख