प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराचे 25 रोजी वितरण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने यंदाचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात गुरुवार, दि. 25 रोजी दुपारी 4 वाजता हा सोहळा होणार आहे. शाल, …

प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराचे 25 रोजी वितरण

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने यंदाचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात गुरुवार, दि. 25 रोजी दुपारी 4 वाजता हा सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, 1 लाख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Kolhapur News)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे हे नववे वर्ष असून, यापूर्वी व्यक्ती आणि संस्थांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. यात भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव, रयत शिक्षण संस्था, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांचा समावेश आहे. (Kolhapur News)
यावर्षीचा 2024 चा पुरस्कार दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला आहे. डॉ. जाधव यांचे 1980 पासून शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान आहे. त्यांच्याच पुढाकाराने विद्यापीठात ललित कला विभाग सुरू झाला आहे. देशातील पत्रकारितेतील पहिले डॉ. ग. गो. जाधव अध्यासन केंद्र उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. एकंदरीतच शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे सतत मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे. (Kolhapur News)
पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत डॉ. जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.