छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल

छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील हर्षी येथील क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना रविवारी सायंकाळी (दि.१२) घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या महिलेचे नाव प्रियंका श्रीराम वाघ (वय ३२, रा. हर्षी, ता. पैठण) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षी येथे रविवारी श्रीराम निवृत्ती वाघ व पत्नी प्रियंका यांनी घरात लक्ष्मीपूजनाचा विधी केला. त्यानंतर या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून श्रीराम यांने पत्नी प्रियांकाच्या कपाळावर हत्याराने जोरदार प्रहार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्रियंका हिला मृत घोषित केले. आज (दि.१३) प्रियंकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मृत प्रियंकाचा भाऊ सचिन साहेबराव पवार (रा. लाडसावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) फिर्याद दिली आहे. प्रभारी डीवायएसपी जयदत्त भवर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी श्रीराम वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, एक आठवड्यापूर्वी पैठण तालुक्यातील कारकीन येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच भर दीपावलीच्या दिवशी हर्षी येथे प्रियंका वाघ या महिलेचा पतीने क्षुल्लक कारणावरून खून केला. त्यामुळे  गावात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा 

छत्रपती संभाजीनगर शहरात एकच दिवशी आगीच्या आठ घटना
छत्रपती संभाजीनगर : यंदा दिवाळी मी साजरी करणार नाही : मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर : ठेचा भाकर खाऊन कोविड योद्ध्यांची दिवाळी

The post छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील हर्षी येथील क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना रविवारी सायंकाळी (दि.१२) घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या महिलेचे नाव प्रियंका श्रीराम वाघ (वय ३२, रा. हर्षी, ता. पैठण) असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षी येथे रविवारी श्रीराम निवृत्ती …

The post छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source