कलानगरला बंगल्यातून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त
पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा -दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरातील लेन एक मधील बंगला क्रमांक ६९, गुरू माऊली निवास येथुन सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अंमलदार पंकज चव्हाण यांना दिंडोरी रोडवरील कला नगरमधील गुरुमाउली बंगल्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखु असे अवैधपणे विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, उपनिरीक्षक यु एम हाके, हवालदार देवराम चव्हाण, अंमलदार पंकज महाले यांनी तात्काळ छापा टाकला. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच भास्कर गरड हा तेथुन पळुन गेला. त्याच्या घराची झडती घेतली असता त्यात वेगवेगळया रंगाचे गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. त्यांची तपासणी केली असता विमल पान मसाला, मिराज किर काकील टोबॅको, वाह पान मसाला, व्ही-१ टोबॅको, डब्ल्यु चॅव्यींग टोबॅको असे प्रतिबंधीत असलेला एकण ६ लाख ६० हजार ६० रूपये किमतीचा पान मसाला व तंबाखु मिळून आली.
यातील संशयित भास्कर लक्ष्मण गरड याच्या विरूध्द हवालदार देवराम चव्हाण यांनी तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मालाबाबत तो कुठून आला व कुठे विक्री होणार होता तर यात आणखी किती व कोण लोक सामील आहे. याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉ किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, पोलीस उपनिरीक्षक यु एम हाके, हवालदार देवराम चव्हाण, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गिरिधर भुसारे, जितु शिंदे यांनी केली आहे.
दिंडोरी रोडवरील कलानगर येथुन सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला गुटखा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत संशयित भास्कर लक्ष्मण गरड यास लवकरच ताब्यात घेणार असून त्याने गुटखा कुठून आणला तसेच त्याची विक्री कोणाला करणार होता याबाबत सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- सुभाष ढवळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे
हेही वाचा :
Manish Sisodia: सिसोदीयाच मद्य धोरणाचे मुख्य आर्किटेक्ट; CBI चा युक्तिवाद, जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन : गुरुजींनी दिलेले घुंगरु फुलवा खामकरने रुचिता-सिद्धेशला दिले भेट
Latest Marathi News कलानगरला बंगल्यातून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त Brought to You By : Bharat Live News Media.