धुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मतदार जनजागृती कार्यक्रम

धुळे पुढारी वृत्तसेवा- मतदार जनजागृती कार्यक्रमांनुसार धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा येथे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. नागरिकांनी कोणतेही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळे शहर मतदारसंघाच्या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, स्वीप नोडल अधिकारी तथा … The post धुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मतदार जनजागृती कार्यक्रम appeared first on पुढारी.

धुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मतदार जनजागृती कार्यक्रम

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- मतदार जनजागृती कार्यक्रमांनुसार धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा येथे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. नागरिकांनी कोणतेही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळे शहर मतदारसंघाच्या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, स्वीप नोडल अधिकारी तथा परिविक्षाधिन नायब तहसिलदार मनोज जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शाहीर सुभाष कुलकर्णी यांनी गीतातून मतदाराचे प्रबोधन कार्यक्रम सादर करुन मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमांस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संरक्षण अधिकारी राकेश नेरकर, संदीप मोरे, नाना पाटील आदी उपस्थित होते. स्वीप अंतर्गत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात विशेष करुन गत लोकसभेत ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ठिकाणी मतदार जनजागृतीचा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध मंदीर परिसर, मस्जिद, तसेच झोपडपट्टी भागात तसेच गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
येत्या 20 मे 2024 होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा परिविक्षाधिन नायब तहसिलदार मनोज जमदाडे यांनी केले आहे.
जामा मस्जिद परिसरात कार्यक्रम
धुळे शहरात जामा मस्जिद परिसर, गल्ली नंबर ७ परिसरात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात विशेष करुन गत लोकसभेत ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ठिकाणी मतदार जनजागृतीचा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागात तसेच गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा –

Janhvi Kapoor-Radhika Merchant : जान्हवी कपूरसह ‘गर्ल गँग’ने सेलिब्रेट केला राधिका मर्चंटचा ब्रायडल शॉवर
T20 WC Team India : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! ‘या’ 15 खेळाडूंना मिळणार जागा

Latest Marathi News धुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मतदार जनजागृती कार्यक्रम Brought to You By : Bharat Live News Media.