बीआरएस नेत्या के कवितांना दिलासा नाहीच, CBI कोठडी वाढवली

पुढारी ऑनलाईन डेस्क: के.कविता यांच्या कोठडीत आणखी १४ दिवस वाढ करण्याची मागणी CBI ने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालाकडे केली होती. या संदर्भातील अर्ज CBIने (केंद्रीय अन्वेषण विभाग) दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात केला होता. परंतु दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात के कविता यांची सीबीआय कोठडी आणखी ८ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यांची ३ दिवसांची … The post बीआरएस नेत्या के कवितांना दिलासा नाहीच, CBI कोठडी वाढवली appeared first on पुढारी.

बीआरएस नेत्या के कवितांना दिलासा नाहीच, CBI कोठडी वाढवली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: के.कविता यांच्या कोठडीत आणखी १४ दिवस वाढ करण्याची मागणी CBI ने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालाकडे केली होती. या संदर्भातील अर्ज CBIने (केंद्रीय अन्वेषण विभाग) दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात केला होता. परंतु दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात के कविता यांची सीबीआय कोठडी आणखी ८ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यांची ३ दिवसांची सीबीआय कोठडी आज संपल्यामुळे त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांची न्यायालयीन कोठडी मंगळवार २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याची संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी (दि. ११ एप्रिल) अटक केली होती. त्यानंतर आज (दि.१२) त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयने बीआरएस नेते के. कविता यांना ५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. पण सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने के. कविता यांच्या सीबीआय कोठडीत ३ दिवसांची वाढ केली आहे. ही सीबीआय कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान त्यांच्या कोठडीत मंगळवार २३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

#WATCH | Excise case: BRS leader K Kavitha being taken from Delhi’s Rouse Avenue Court after hearing.
K Kavitha was sent to judicial custody till April 23. pic.twitter.com/AzCHRHTEoP
— ANI (@ANI) April 15, 2024

मद्य व्यावसायिकाने घेतली होती केजरीवालांची भेट
दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी दरम्यान सीबीआयने असा युक्तिवाद केला आहे की दक्षिणेतील एका मद्य व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी सदर व्यवसायिकाने दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला आणि त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांना के. कविता त्यांच्याशी संपर्क करतील असे सांगितले होते. आमच्याकडे याबाबतचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि संबंधित आरोपींचे जबाब आहेत, असेदेखील सीबीआयने म्हटले आहे. (K Kavitha)
के. कविता तथ्ये लपवत असल्याचा CBI चा आरोप
बीआरएस नेत्या के. कविता त्यांच्या माहितीत असलेली तथ्ये लपवत आहेत. तपासात सहकार्य करत नाहीत असा आरोपदेखील सीबीआयने त्यांच्यावर केला. यापूर्वी नोटीस देऊनही त्या अनेकवेळा तपासास हजर झाल्या नाहीत. सीबीआयच्या सरकारी वकिलांना त्यांची चौकशी करायची आहे, त्यामुळे के. कविता यांची ५ दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे गेल्या सुनावणीवेळी केली होती, तेव्हा न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ केली. आज पुन्हा के. कविता यांच्या कोठडीत ८ दिवसांची वाढ केली आहे.
हेही वाचा:

K Kavitha | केजरीवाल, दक्षिणेतील मद्यविक्रेता आणि के. कविता यांचा संबंध काय? CBI ने केला खळबळजनक दावा
K Kavitha News: के. कविता यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला
K Kavitha News: ‘हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग’; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल

 
Latest Marathi News बीआरएस नेत्या के कवितांना दिलासा नाहीच, CBI कोठडी वाढवली Brought to You By : Bharat Live News Media.