भाजपचे संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान मोदींची गॅरंटी : फडणवीस
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने रविवारी घोषित केला. यावर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपचे हे केवळ संकल्प पत्र नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे आज (दि.१५) माध्यमांशी ते बोलत होते. “भाजपच संकल्पपत्र अत्यंत व्यापक असून ते महिला, युवा, गरिबांना समर्पित आहे. या ‘संकल्प पत्र’मध्ये महिला, गरीब आणि समाजातील सर्व घटकांसाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Latest Marathi News भाजपचे संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान मोदींची गॅरंटी : फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.