कोण आहे भद्रेशकुमार पटेल?; ज्याच्या शोधासाठी अमेरिकेने जाहीर केले २ कोटींचे बक्षीस

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने फरार असलेल्या एका भारतीय आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर २ कोटी रुपयांचे (२,५०,००० डॉलर) बक्षीस जाहीर केले आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल (Bhadreshkumar Chetanbhai Patel) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा गुजरातचा असून त्याचे नाव एफबीआयने दहा मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले आहे. “१२ एप्रिल २०१५ रोजी हॅनोवर, … The post कोण आहे भद्रेशकुमार पटेल?; ज्याच्या शोधासाठी अमेरिकेने जाहीर केले २ कोटींचे बक्षीस appeared first on पुढारी.

कोण आहे भद्रेशकुमार पटेल?; ज्याच्या शोधासाठी अमेरिकेने जाहीर केले २ कोटींचे बक्षीस

Bharat Live News Media ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने फरार असलेल्या एका भारतीय आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर २ कोटी रुपयांचे (२,५०,००० डॉलर) बक्षीस जाहीर केले आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल (Bhadreshkumar Chetanbhai Patel) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा गुजरातचा असून त्याचे नाव एफबीआयने दहा मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले आहे.
“१२ एप्रिल २०१५ रोजी हॅनोवर, मेरीलँड येथे एका डोनटच्या दुकानात काम करत असताना पत्नीचा खून केल्याचा पटेल याच्यावर आरोप आहे. टेन मोस्ट वाँटेड फरारी आरोपी भद्रेशकुमार चेतनभाई पटेलची माहिती देणाऱ्यास २,५०,००० डॉलर (२ कोटी ९ लाख रुपये) पर्यंत बक्षीस देऊ.” असे एफबीआयने जाहीर केले आहे.
पटेल यांच्यावर १२ एप्रिल २०१५ रोजी हॅनोवर, मेरीलँड येथील एका डोनटच्या दुकानात काम करत असताना पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. तो २०१७ पासून FBI च्या रडारवर आहे. पण अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही.
नेमकं काय झालं?
वृत्तानुसार, पटेल याने दुकानाच्या मागील खोलीत ग्राहकांच्या समोर त्याच्या पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला करुन अनेक वार केले होते. पटेल आणि पलक त्या रात्री डंकिन डोनट्स स्टोअरमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होते. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण जेवणाच्या खोलीकडे जात असल्याचे दिसून आले होते. ज्यावेळी ही घटना घडली होती तेव्हा भ्रदेश २४ वर्षाचा आणि त्याची पत्नी २१ वर्षाची होती. त्याची पत्नी पलकला व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात परत यायचे होते. पण पतीने त्याला विरोध केला आणि दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर त्याने तिची हत्या केली. भद्रेशकुमार हा मुळचा गुजरातच्या अहमदाबाद येथील वीरमगाम येथील आहे.
आरोप काय?
पटेलवर (Bhadreshkumar Chetanbhai Patel) फर्स्ट-डिग्री खून, सेकंड-डिग्री खून, फर्स्ट-डिग्री हल्ला, सेकंड-डिग्री हल्ला आणि दुखापत करण्याच्या उद्देशाने धोकादायक शस्त्र बाळगणे यासारख्ये आरोप ठेवण्यात आले आहेत. फरार असलेल्या पटेल याच्याविरुद्ध अमेरिकेच्या बाल्टिमोर येथील जिल्हा न्यायालयाने २० एप्रिल २०१५ रोजी अटक वॉरंट जारी केले होते.

The #FBI offers a reward of up to $250,000 for info leading to the arrest of Ten Most Wanted Fugitive Bhadreshkumar Chetanbhai Patel, wanted for allegedly killing his wife while they were working at a donut shop in Hanover, Maryland, on April 12, 2015: https://t.co/tCZ0Fde7WQ pic.twitter.com/GGLK4dBLhA
— FBI Most Wanted (@FBIMostWanted) April 12, 2024

हे ही वाचा :

१ कोटी तरुणांना सरकारी नोकरी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर; बिहारमध्ये RJD कडून घोषणांचा पाऊस
लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’! काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर?

The post कोण आहे भद्रेशकुमार पटेल?; ज्याच्या शोधासाठी अमेरिकेने जाहीर केले २ कोटींचे बक्षीस appeared first on Bharat Live News Media.

Go to Source