बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याची संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी (दि. ११ एप्रिल) अटक केली होती. … The post बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी appeared first on पुढारी.

बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याची संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी (दि. ११ एप्रिल) अटक केली होती. त्यानंतर आज (दि.१२) त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयने बीआरएस नेते के. कविता यांना पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. पण सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने के. कविता यांच्या सीबीआय कोठडीत ३ दिवसांची वाढ केली आहे.
मद्य व्यावसायिकाने घेतली होती केजरीवालांची भेट
दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी दरम्यान सीबीआयने असा युक्तिवाद केला आहे की दक्षिणेतील एका मद्य व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी सदर व्यवसायिकाने दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला आणि त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांना के. कविता त्यांच्याशी संपर्क करतील असे सांगितले होते. आमच्याकडे याबाबतचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि संबंधित आरोपींचे जबाब आहेत, असेदेखील सीबीआयने म्हटले आहे. (K Kavitha)
बीआरएस नेत्या के. कविता त्यांच्या माहितीत असलेली तथ्ये लपवत आहेत. तपासात सहकार्य करत नाहीत असा आरोपदेखील सीबीआयने त्यांच्यावर केला. यापूर्वी नोटीस देऊनही त्या अनेकवेळा तपासास हजर झाल्या नाहीत. सीबीआयच्या सरकारी वकिलांना त्यांची चौकशी करायची आहे, त्यामुळे के. कविता यांची ५ दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे केली.

#BREAKING : Delhi Court Remands BRS Leader K Kavitha To CBI Custody Till April 15 In Liquor Policy Case#KKavitha #CBI #LiquorScam https://t.co/FBRGNq1mop
— Live Law (@LiveLawIndia) April 12, 2024

The post बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source