दुर्दैवी ! रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाळकी : नगर-दौंड रेल्वेमार्गावर खंडाळा (ता.नगर) शिवारात पटना एक्स्प्रेसची धडक बसून तरुण सेंट्रिंग व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 22) रात्री घडली. संजय गवराज देवकर (वय 30 रा. चास ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत संजय देवकर हे नगर तालुक्यात सेंट्रिंगची कामे घेत असत. बुधवारी ते कामानिमित्त खंडाळा (ता. नगर) शिवारात गेले … The post दुर्दैवी ! रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

दुर्दैवी ! रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाळकी : नगर-दौंड रेल्वेमार्गावर खंडाळा (ता.नगर) शिवारात पटना एक्स्प्रेसची धडक बसून तरुण सेंट्रिंग व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 22) रात्री घडली. संजय गवराज देवकर (वय 30 रा. चास ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत संजय देवकर हे नगर तालुक्यात सेंट्रिंगची कामे घेत असत.
बुधवारी ते कामानिमित्त खंडाळा (ता. नगर) शिवारात गेले होते. त्यांना नगर-दौंड रेल्वेमार्गावर पटना एक्सप्रेसची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांचे नातेवाईक मारुती सूर्यभान देवकर यांनी उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी संजय देवकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
याबाबतची डॉ. खराडे यांनी रुग्णालयातील पोलिसांना माहिती दिली. पोलिस अंमलदार मरकड यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गुरुवारी (दि.23) दुपारी चास येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा
नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडत लांबवले ७५ हजार
फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
Nagar News : तिसगावमधील अतिक्रमणे लवकरच हटणार
The post दुर्दैवी ! रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

वाळकी : नगर-दौंड रेल्वेमार्गावर खंडाळा (ता.नगर) शिवारात पटना एक्स्प्रेसची धडक बसून तरुण सेंट्रिंग व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 22) रात्री घडली. संजय गवराज देवकर (वय 30 रा. चास ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत संजय देवकर हे नगर तालुक्यात सेंट्रिंगची कामे घेत असत. बुधवारी ते कामानिमित्त खंडाळा (ता. नगर) शिवारात गेले …

The post दुर्दैवी ! रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source