पुरावे नाहीत म्हणून मराठा समाजाची फसवणूक : मनोज जरांगे पाटील
शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : पुरावे नाहीत, या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक केली गेली. आमचे पुरावे बुडाखाली लपुन ठेवणार्यांचे नावे जाहीर करा. आता, आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शेवगाव शहरात गुरुवारी (दि. 23) मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जागृती सभा झाली. दुपारी एक वाजता होणारी सभा चार तास उशिराने म्हणजे पाच वाजता सुरू झाली. तरीही सकल मराठा समाज मोठ्या संख्याने उपस्थित होते.
जरांगे पाटील यांचे शहरात आगमन होताच क्रांती चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गाडगेबाबा चौकात 21 जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दुतर्फा स्वयंमसेवकांनी त्यांच्या ताफ्याला संरक्षण दिले होते. जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचा विश्वासघात केला आहे. मराठ्यांनी विश्वास ठेवल्यामुळेच आज ही परिस्थिती आली आहे. ज्या-ज्या समित्या 75 वर्षात झाल्या, त्यांनी पुरावे नाहीत म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत नाही, असे सांगितले.
आता, पुरावे कसे सापडायला लागलेत असा सवाल त्यांनी केला. हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिले असते तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात राहिली असती. मात्र, त्यावेळी मराठ्यांची मुले संपवण्याचे षडयत्र केले, ते ओळखले नाही. काही नेत्यांचा 70 वर्षापूर्वी सरकारवर मोठा प्रभाव होता. त्यांनी मराठा आरक्षण मिळू दिले नाही. आता, आरक्षणासाठी आमचे आंदोलन शांततेत चालू आहे.
हेही वाचा
नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडत लांबवले ७५ हजार
दु्र्दैवी : गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; राजूरच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा
नागपूर : तीन इंजिन काय आग लावायला आहेत का? : नाना पटोले
The post पुरावे नाहीत म्हणून मराठा समाजाची फसवणूक : मनोज जरांगे पाटील appeared first on पुढारी.
शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : पुरावे नाहीत, या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक केली गेली. आमचे पुरावे बुडाखाली लपुन ठेवणार्यांचे नावे जाहीर करा. आता, आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शेवगाव शहरात गुरुवारी (दि. 23) मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जागृती सभा झाली. दुपारी एक वाजता …
The post पुरावे नाहीत म्हणून मराठा समाजाची फसवणूक : मनोज जरांगे पाटील appeared first on पुढारी.