फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवारांची टीका
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपला २०१९ मध्ये २२ टक्के मते मिळाली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आता आमच्याकडे जो सर्व्हे आहे, त्यात भाजपला १७ ते १८ टक्के पेक्षा जास्त मते नाहीत. दोन्ही फुटीरवाद्यांना जे चिन्ह मिळेल त्यावर त्यांच्यात लढण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनाही कमळ हाती घ्यावे लागेल, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Maharashtra Political News)
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, मेळाव्याची तयारी ओबीसी बांधवांनी केली. ओबीसी बांधवांचे फोन येत आहेत. इच्छा व्यक्त करत आहेत. हिंगोली सभेला जाणार आहे. ओबीसी प्रश्नी छगन भुजबळांनी सुद्धा राजीनामा देण्याची भूमिका मांडली. मला भुजबळ यांचा तीन चार वेळा फोन आला. ओबीसींच्या भावनेला छेद जाऊ नये, चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी या मेळाव्याला आग्रहामुळे जात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
सरकारमध्ये असंतोष आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांवर एकमेकांविरुद्ध बोलत असतात. आज २० मंत्री एकमेकांविरोधात उभे राहिलेत. सरकारमध्ये जे दिसतंय, तिघांची दिशा खुद्द दिल्ली हायकमांड समजावून सांगत असताना परत येऊन फाईली अडवून एकमेकांची जिरवा, असे सारे सरकारमध्ये सुरू आहे. काही चुकीचं झालं असेल तर त्यावर निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणे अपेक्षित आहे. गृह खात्यानेही वेळीच याबाबत स्पष्टता करणे गरजेचे आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
The post फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवारांची टीका appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपला २०१९ मध्ये २२ टक्के मते मिळाली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आता आमच्याकडे जो सर्व्हे आहे, त्यात भाजपला १७ ते १८ टक्के पेक्षा जास्त मते नाहीत. दोन्ही फुटीरवाद्यांना जे चिन्ह मिळेल त्यावर त्यांच्यात लढण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनाही कमळ हाती घ्यावे लागेल, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Maharashtra …
The post फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवारांची टीका appeared first on पुढारी.