नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली

लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा- ठेंगोडा (ता. बागलाण) येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून पेटीतील अंदाजे ७५ हजारांची रोकड लंपास केली.
मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघा अज्ञातांनी मंदिराच्या दक्षिण बाजूने प्रवेश करून ‘श्रीं’च्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडले. पेटीतील अंदाजे ७५ हजार रुपयांची रोकड, नाणी चोरट्यांनी पळविली. पहाटे चार वाजता मंदिर ट्रस्टचे सचिव मोतीलाल चौधरी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले असता त्यांना दानपेटीचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तत्काळ ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांना कळविले. सटाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दिवसभरात ठसेतज्ज्ञ व श्वानपथक चोरट्यांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत हाेते. मात्र, कोणताही सुगावा लागला नाही. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली असून, मोतीलाल चौधरी यांनी सटाणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत करीत आहेत.
हेही वाचा :
Uttarkashi Tunnel Rescue | प्रतीक्षा वाढली! कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ?
यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती
The post नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली appeared first on पुढारी.
लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा- ठेंगोडा (ता. बागलाण) येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून पेटीतील अंदाजे ७५ हजारांची रोकड लंपास केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघा अज्ञातांनी मंदिराच्या दक्षिण बाजूने प्रवेश करून ‘श्रीं’च्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडले. पेटीतील अंदाजे ७५ हजार रुपयांची रोकड, नाणी चोरट्यांनी पळविली. पहाटे चार वाजता मंदिर …
The post नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली appeared first on पुढारी.
