सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांनी जाहीर केली भूमिका

पुढारी ऑनलाईन : सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी या जागेबाबत फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसतर्फे इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील देखील उपस्थित होते. (Sangli Lok Sabha) … The post सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांनी जाहीर केली भूमिका appeared first on पुढारी.

सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांनी जाहीर केली भूमिका

Bharat Live News Media ऑनलाईन : सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी या जागेबाबत फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसतर्फे इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील देखील उपस्थित होते. (Sangli Lok Sabha)
सांगली हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यातील जागा ही काँग्रेस लढवण्यासाठी सक्षम आहे. पण याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला. त्यांनी चंद्रहार पाटील यांची अचानक उमेदवारीही जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीतर्फे सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. पण उमेदवारीच्या पेचामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. सांगली हा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसने या जागेवर त्यांचा दावा कायम ठेवला आहे.
Latest Marathi News सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांनी जाहीर केली भूमिका Brought to You By : Bharat Live News Media.