मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी: पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपा नेत्यांची बोलण्याची पातळी घसरलेली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भावा आणि बहिणीच्या पवित्र नात्याबद्दल जे अपशब्द वापरले आहेत, त्यातून सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे  तक्रार दाखल केली आहे. आता याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी … The post मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी: पटोले appeared first on पुढारी.

मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी: पटोले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपा नेत्यांची बोलण्याची पातळी घसरलेली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भावा आणि बहिणीच्या पवित्र नात्याबद्दल जे अपशब्द वापरले आहेत, त्यातून सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे  तक्रार दाखल केली आहे. आता याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
गोंदिया येथील प्रचार दौऱ्यात ते माध्यमांशी बोलत होते.
वर्षा गायकवाड यांच्या गैरहजेरीमुळे मुंबईत पत्रपरिषद रद्द झाली. याविषयी छेडले असता पटोले म्हणाले की, त्या स्वतः मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. आता जे झाले आणि हायकमांडनी जे आदेश दिले आहेत, त्यानुसार त्यांनी सगळ्यांची समजूत घालून कामाला लागावे. केंद्रीय नेतृत्व जे सांगतील, त्यानुसार ते काम करतील. संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर बोलताना हा कॉमेडी आणि कुणाच्या थट्टा करायचा हा काळ नाही. आज काँग्रेससमोर लोकशाही वाचवण्याचा प्रश्न आहे, संविधान वाचवण्याच्या प्रश्न आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देश विकण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे,  लोकशाही संपविण्याचे काम केले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा 

Ashok Chavan on Nana Patole | नाना पटोले यांनी घातपाताचे पुरावे द्यावेत : अशोक चव्हाण
Nana Patole : अपघात की घातपाताचा प्रयत्न? नाना पटोले म्हणाले…
Chitra Wagh on Nana Patole:  चित्रा वाघ यांची नाना पटोले यांच्यावर बोचरी टीका, म्हणाल्या…   

Latest Marathi News मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी: पटोले Brought to You By : Bharat Live News Media.