जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ आज दि. १० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळीत अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक असे की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्राहक मंच परिसरात असलेल्या इलेक्ट्रीक … The post जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ आज दि. १० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळीत अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्राहक मंच परिसरात असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ दि. १० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयास्पदरित्या एका अनोळखी तरूणाचा जळालेला व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. मयताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :

जळगाव : ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून सव्वा लाखांची रक्कम पोबारा
कोल्हापुरातील बनावट नोटा छपाई आणि विक्री रॅकेटचा छडा; ७ जणांना अटक
Gold Prices Today | सोने ७२ हजार पार, चांदीही चमकली! दरवाढीचे कारण काय?

Latest Marathi News जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.