यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा:  नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कर वाढविल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. वास्तविक करासारखे विषय नागरिकांना आर्थिक झळ पोहोचविणारे असल्यामुळे संवेदनशील असतात. त्यामुळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी एकत्र बसून याबाबत निर्णय घेत असतात. नगर परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. … The post यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा appeared first on पुढारी.
#image_title

यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा:  नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कर वाढविल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

वास्तविक करासारखे विषय नागरिकांना आर्थिक झळ पोहोचविणारे असल्यामुळे संवेदनशील असतात. त्यामुळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी एकत्र बसून याबाबत निर्णय घेत असतात. नगर परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकनाची सूचना वितरित केली आहे. यामध्ये मालमत्ता करात प्रचंड वाढ करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

यावर आक्षेप नोंदविले जात आहे. करवाढ अवाजवी असल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रशेखर चौधरी तसेच ओम तिवारी यांनी दिला. याशिवाय शहरात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका वैशाली सवई, उषाताई दिवटे, पल्लवीताई रामटेके, ताई मसाळ, अजय किन्हीकर, कपिल गजभिये आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

यवतमाळ : खड्डा खोदून चोरीच्या दुचाकी लपविणाऱ्या भामट्याला अटक
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 11 युवकांनी बनविली हायड्रोजन कार
Uday Samant : यवतमाळला व्हिटारा कंपनीचा प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

The post यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा appeared first on पुढारी.

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा:  नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कर वाढविल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. वास्तविक करासारखे विषय नागरिकांना आर्थिक झळ पोहोचविणारे असल्यामुळे संवेदनशील असतात. त्यामुळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी एकत्र बसून याबाबत निर्णय घेत असतात. नगर परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. …

The post यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Go to Source