पोलिसांच लक्ष चुकवण्याच्या प्रयत्नात वाळूची पिकअप विहिरीत कोसळली
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी केलेला पाठलाग चुकविण्याच्या नादात रिकामी मोकळी पिकअप थेट शेतातील एका विहिरीतच कोसळली. मात्र वाळूची बेकायदेशीर वाहतूककरणारे ३ मजूर विहिरीतून बाहेर येत थोडक्यात बांलबाल बचावले आहेत. तर पिकअप चालकाचा मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात शनिवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक परिसरातील प्रवरा नदी पात्रामधून विना परवाना बेकायदेशीररित्या वाळूनेभरलेली पिकअप धांदरफळ बुद्रुकच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. अस ल्याची माहिती पिकअप चालक गोरखनाथ खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आली.
त्याने पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी भर धाव वेगाने पिकअप एका शेतात घातली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला अन वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्या लगत असणार्या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली.
हेही वाचा
यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास
IFFI 2023 : महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा ‘फाईट लाइक अ गर्ल’
Pune News : भगदाडे पडून मुठा कालव्याची झाली चाळण
The post पोलिसांच लक्ष चुकवण्याच्या प्रयत्नात वाळूची पिकअप विहिरीत कोसळली appeared first on पुढारी.
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी केलेला पाठलाग चुकविण्याच्या नादात रिकामी मोकळी पिकअप थेट शेतातील एका विहिरीतच कोसळली. मात्र वाळूची बेकायदेशीर वाहतूककरणारे ३ मजूर विहिरीतून बाहेर येत थोडक्यात बांलबाल बचावले आहेत. तर पिकअप चालकाचा मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात शनिवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. …
The post पोलिसांच लक्ष चुकवण्याच्या प्रयत्नात वाळूची पिकअप विहिरीत कोसळली appeared first on पुढारी.