Rain Alert : यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार; स्कायमेटचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा देशात मान्सून सामान्य राहणार असून, तो सरासरी ९६ ते १०४ टक्के बरसेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान कंपनीने वर्तवला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाला, तरी पुढे तो भरून निघेल. जुलै व सप्टेंबरमध्ये अनुक्रमे १०५ व ११० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजात म्हटले आहे की, … The post Rain Alert : यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार; स्कायमेटचा अंदाज appeared first on पुढारी.

Rain Alert : यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार; स्कायमेटचा अंदाज

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदा देशात मान्सून सामान्य राहणार असून, तो सरासरी ९६ ते १०४ टक्के बरसेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान कंपनीने वर्तवला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाला, तरी पुढे तो भरून निघेल. जुलै व सप्टेंबरमध्ये अनुक्रमे १०५ व ११० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजात म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या दीर्घ कालावधीत देशात 868.6 मी. मी इतका पाऊस होईल. त्याची टक्केवारी 96 ते 104 टक्के इतकी असेल. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांच्या मते, अल-निनो झपाट्याने ला-नीनाकडे वळत आहे. ला-निना वर्षामध्ये मान्सूनचे अभिसरण अधिक मजबूत होते. अल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे पावसाळ्याची सुरुवात खराब होऊ शकते. मात्र, सीझनच्या उत्तरार्धात प्राथमिक टप्प्यापेक्षा जबरदस्त पाऊस पडेल.
मान्सूनसाठी सकारात्मक स्थिती
मान्सूनवर यंदा सकारात्मक घटक तयार होत आहेत. हिंद महासागरात द्विध्रुवीय स्थिती असताना मान्सूनला सुरक्षिततेकडे नेले आहे. पावसाचे वितरण संपूर्ण हंगामासाठी वैविध्यपूर्ण आणि असमान असण्याची शक्यता आहे.
असे आहेत स्कायमेटचे अंदाज
– सामान्य मान्सूनची शक्यता : 45 टक्के (96 ते 104 टक्के)
– सामान्यपेक्षा कमी ः15 टक्के शक्यता (90 ते 95 टक्के)
– दुष्काळाची शक्यता ः10 टक्के (90 टक्यांपेक्षा कमी)
कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल
– जून ः95 ते 102 टक्के (165.3 मी. मी )
– जुलै : 105 टक्के (280.5 मी. मी)
– ऑगस्ट : 98 ते 100 टक्के (254.9 मी. मी.)
– सप्टेंबर : 110 टक्के (167.9 मी.मी)
Latest Marathi News Rain Alert : यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार; स्कायमेटचा अंदाज Brought to You By : Bharat Live News Media.