मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत देशभरातील दौऱ्यादरम्यान सशस्त्र कमांडो असणार आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, “केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला राजीव कुमार यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक जवानांची तुकडी पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान संभाव्य धोके पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राजीव कुमार यांना त्यांच्या देशभरातील प्रवासादरम्यान, दिल्लीत त्यांच्या कार्यालयासह निवासस्थानीही आवश्यक सुरक्षा प्रदान केली जाईल.
राजीव कुमार यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडोसह एकूण २२ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये एनएसजी कमांडो आणि पोलिसांचा समावेश असेल. राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सशस्त्र स्थिर रक्षक, चोवीस तास सुरक्षा देणारे खाजगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि तीन शिफ्टमध्ये काम करणारे सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो असतील. याशिवाय राजीव कुमार यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये वॉचर्स आणि प्रशिक्षित ड्रायव्हर स्टँडबायवर असतील.
Latest Marathi News मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा Brought to You By : Bharat Live News Media.