पिंपरी : मद्यप्राशन करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांकडून मित्रांची झाडाझडती

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत मद्यप्राशन करत असलेल्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, संशय बळावल्याने पोलिसांनी मित्रांची चांगली झाडाझडती घेतली. मावळ तालुक्यातील बदलवाडी येथे मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली. अमोल मारुती बदाळे (३२, रा. बदलवाडी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा मंगळवारी त्याच्या मित्रांसोबत मद्यप्राशन … The post पिंपरी : मद्यप्राशन करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांकडून मित्रांची झाडाझडती appeared first on पुढारी.

पिंपरी : मद्यप्राशन करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांकडून मित्रांची झाडाझडती

पिंपरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : मित्रांसोबत मद्यप्राशन करत असलेल्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, संशय बळावल्याने पोलिसांनी मित्रांची चांगली झाडाझडती घेतली. मावळ तालुक्यातील बदलवाडी येथे मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली.
अमोल मारुती बदाळे (३२, रा. बदलवाडी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा मंगळवारी त्याच्या मित्रांसोबत मद्यप्राशन करत होता. त्यावेळी त्यांच्यात थट्टा सुरू होती. दरम्यान, अमोल अचानक बेशुद्ध पडला. मित्रांनी अमोल याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अमोलच्या खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे अमोल याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार अमोल याचा मृत्यू हृदविकाराने झाल्याचे समोर आल्याने प्रकरण शांत झाले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Latest Marathi News पिंपरी : मद्यप्राशन करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांकडून मित्रांची झाडाझडती Brought to You By : Bharat Live News Media.