हिवाळ्यात बाजरीचे सेवन ठरते हितकारक
नवी दिल्ली : भारताच्या प्रयत्नामुळे जगभरात सध्या ‘मिलेट्स’ म्हणजेच भरडधान्याच्या लाभाविषयी जनजागृती होत आहे. बाजरी, नाचणी, बार्ली, ज्वारी आदी अनेक प्रकारची भरडधान्ये आहेत, जी अत्यंत पौष्टिक व आरोग्यास हितकारक असतात. आपल्याकडे भोगीच्या सणाला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात बनवला जात असतो. मात्र, केवळ या सणालाच नव्हे तर संपूर्ण हिवाळ्यातच बाजरीचे सेवन आरोग्यास हितकारक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाजरी खाल्याने आतड्यांना ताकद मिळते. कारण बाजरीत फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या आतड्यांसाठी प्रो-बायोटिक म्हणून काम करतात. आपल्या आतड्यांमध्ये काहीही न अडकता आपल्या बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी फायबर महत्त्वाचे असते. बाजरीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास आपली पचनशक्ती वाढते. बाजरीचे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. बाजरीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात.
बाजरीची पचनक्रिया हळूहळू होते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही व वजन कमी करण्यास मदत होते. आपल्या रोजच्या आहारात आपण जे काही खातो त्याचे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट फायबर असते. फायबर योग्य प्रमाणात मिळाले तर मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बाजरीत फायबर खूप असते आणि त्यात पचण्यायोग्य स्टार्च असल्याने मधुमेह नियंत्रणात राहते. बाजरीत असलेले मॅग्नेशियम आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. इतकेच नाही तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. याशिवाय स्ट्रोक होण्याची शक्यतादेखील कमी होते.
The post हिवाळ्यात बाजरीचे सेवन ठरते हितकारक appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : भारताच्या प्रयत्नामुळे जगभरात सध्या ‘मिलेट्स’ म्हणजेच भरडधान्याच्या लाभाविषयी जनजागृती होत आहे. बाजरी, नाचणी, बार्ली, ज्वारी आदी अनेक प्रकारची भरडधान्ये आहेत, जी अत्यंत पौष्टिक व आरोग्यास हितकारक असतात. आपल्याकडे भोगीच्या सणाला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात बनवला जात असतो. मात्र, केवळ या सणालाच नव्हे तर संपूर्ण हिवाळ्यातच बाजरीचे सेवन आरोग्यास हितकारक ठरते, असे तज्ज्ञांचे …
The post हिवाळ्यात बाजरीचे सेवन ठरते हितकारक appeared first on पुढारी.