नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट

महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळख असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडी पडायला सुरुवात होताच देश-विदेशातील परदेशी पक्षी दाखल होत आहेत. धरणामुळे या ठिकाणी सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येत आहे. पक्षी दाखल झाल्याने अनेक पक्षिप्रेमी, पर्यटक सुटीच्या दिवशी अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी गर्दी करत आहेत. (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary) दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी हंगामातील … The post नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट appeared first on पुढारी.
#image_title

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट

देवगाव (जि. नाशिक) : उमर फारूक काद्री

महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळख असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडी पडायला सुरुवात होताच देश-विदेशातील परदेशी पक्षी दाखल होत आहेत. धरणामुळे या ठिकाणी सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येत आहे. पक्षी दाखल झाल्याने अनेक पक्षिप्रेमी, पर्यटक सुटीच्या दिवशी अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी गर्दी करत आहेत. (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary)
दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी हंगामातील पक्षी प्रगणना क्र. २ सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत झाली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, नांदूरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरडगाव, काथरगाव अशा सात ठिकाणी पक्षी निरीक्षणात विविध प्रकारचे पाणपक्षी १०,९३० व झाडावरील गवताळ भागातील पक्षी ५,७४० अशा एकूण १६,६६० पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
बार हेड, गुज, ऑस्प्रे, काॅमन क्रेन, मार्शहरीहर, काॅमन पोटार्ड, पोलिस हरिहर, ग्रेटर, स्पाॅटेडहगल, गाग्ररनी या परदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्षी आढळून आले. पक्षी सप्ताहानिमित्त बी.एन.एच.एस. संस्थेमार्फत एकता शेखावत, अनन्या अग्निहोत्री, आशुतोष मिश्रा, निखिल घाडीगावकर, अभिनव नायर यांनी पक्षी विषयक प्रशिक्षण दिले. जात, पंथ, वर्ण, पक्ष भेद विसरून हे पक्षी अभयारण्य परिसरात मुक्त विहार करताना आणि गटागटाने दिसू लागले आहेत. पक्ष्यांचे आगमन होऊ लागल्याने पक्षिप्रेमींची पावले अभयारण्याच्या दिशेने वळू लागली असून, पर्यटकांच्या दुर्बिणी पक्षी निरीक्षणासाठी सरसावल्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिने हा परिसर पर्यटकांनी गजबजणार आहे. महाराष्ट्राचे भरतपूर किंबहुना नुकताच ‘रामसर’चा दर्जा प्राप्त झालेला आहे. सध्या हळूहळू थंडीची चाहूल लागत असल्याने पक्ष्यांचेही आगमन होत आहे. वनविभागाच्या पर्यटकांसाठी येथे निवासस्थाने तसेच रस्ते पर्यटनासाठी ठिकठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण केल्या आहेत, तर येथील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अनेक पर्यटक येथे माशांचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे धरण परिसरात हॉटेल आणि मत्स्य विक्रीचा व्यवसाय बहरला आहे.  (Nandur Madhyameshwar)
पक्षी अभयारण्य वनविभागाने पक्ष्यांना बसण्यासाठी खास झाडाच्या आकारांच्या प्रतिकृती निर्माण केल्या आहेत. येथील अभयारण्य परिसरात विविध प्रकारच्या जैव वनस्पतीही आढळतात तसेच धरणातील पाण्यावर कमळ फुले मोठ्या प्रमाणात तरंगताना दिसतात. सध्या येथे उघड्या चोचीचा करकोचा, साधा करकोचा, काळा शेपटीचा ठिपकेवाला गरुड, ब्राह्मणी बदक, चमचा, जांभळी पाणकोंबडी, खंड्या, थापट्या, कापशी बदक, चित्र बलाक, दलदल ससाणा, शेकोट्या, काळा शराटी, मोर शराटी, हळदी-कुंकू, वेडा राघू, नकटा बदक, चिमण सेंद्र्या, टीबुकली नदी सुरय, चक्रवाल गप्पीदास, श्वेत करकोचा, वारकरी, तुतारी, कोकिळा, चातक, खाटीक, मुनिया, वनचक, हळद्या, साळुंकी, तलवार बदक आदी पक्ष्यांबरोबरच पाणकावळा, नोरी, कर्णफूल, जलकुंभी, गोलकुसल, तिली, सदाफुली, लाजाळू, नळीची भाजी, शेराल, जलपिंपली, कोरफड, गोखरू आदी वनस्पती आढळतात. येथील नदीपात्रात बांगूर, तलिफा, मर्‍हळ, वांब, कोंबडा, कटला, राहू, मुरंगी, खवल्या, मुरा, पावरा, सिंधी, घोगर्‍या, डोकर्‍या, झिंगा आदी प्रकारचे मासे येथे आढळतात. त्यामुळे खवय्यांचीदेखील हिवाळ्यात गर्दी होते. 
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल प्रीतीश सरोदे, वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, तर वनमजुरांमध्ये गंगाधर आघाव, प्रमोद पाटील, संजय गायकवाड, सुनील जाधव, प्रकाश गांगुर्डे, एकनाथ साळवे, गाइड अमोल दराडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, विकास गारे, ओमकार चव्हाण आदी या अभयारण्याची सुरक्षा पाहात आहेत. पक्षी निरीक्षणाच्या दुर्बिणी, पर्यटकांसाठी रस्ते, वाहनतळ, पक्षी निरीक्षणासाठी नऊ मनोरे, परिसराची तसेच पक्ष्यांची माहिती देण्यासाठी गाइड याबरोबरच शाकाहारी आणि मांसाहारी भोजनासाठी हॉटेल आदी सुविधा येथे असल्याने पर्यटकांनी नांदूरमध्यमेश्वर परिसर गजबजला आहे.
पर्यटकांना फ्लेमिंगोची प्रतीक्षाच  (Nandur Madhyameshwar)
सध्या येथील पक्षी अभयारण्यात वनविभागाने पक्षी निरीक्षणासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी प्रत्येक मनोर्‍यावर गाइड आणि दुर्बिणीची व्यवस्था केली आहे. एकूणच जसजशी थंडी वाढत जाईल तस-तसे पक्षी आणि पर्यटकांची संख्याही वाढत जाणार आहे. त्यामुळे काही दिवस येथील अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट दिसणार आहे. मात्र पर्यटकांना फ्लेमिंगोंची प्रतीक्षाच असून, अनेक वर्षांपासून येथे हजेरी लावणारा आणि पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याने यंदा या अभयारण्याकडे पाठ फिरविल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. कच्छच्या रणावरून येणारा तसेच चार फूट उंच, लांब चोच, उंच पाय, पंखांच्या खालून लाल रंग असा हा पक्षी आकाशात उडताना अग्नीच्या ज्वाळेसारखा दिसतो. म्हणून यास ‘अग्निपंख’ म्हणतात. हिमालयात तो ‘रोहित’ नावाने ओळखला जातो.
हेही वाचा :

अंतराळातून पृथ्वीला प्रथमच मिळाला लेसर संदेश
तुटलेल्या उसाचे शेतकर्‍यांना 112 कोटी मिळणार
राज्यातील सर्व समाजाच्या सर्वेक्षणासाठी तयारी..

The post नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट appeared first on पुढारी.

महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळख असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडी पडायला सुरुवात होताच देश-विदेशातील परदेशी पक्षी दाखल होत आहेत. धरणामुळे या ठिकाणी सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येत आहे. पक्षी दाखल झाल्याने अनेक पक्षिप्रेमी, पर्यटक सुटीच्या दिवशी अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी गर्दी करत आहेत. (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary) दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी हंगामातील …

The post नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट appeared first on पुढारी.

Go to Source