पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पाचोड (ता. पैठण) परिसरातील हॉटेल निर्सगच्या पाठीमागे असलेल्या शेतातील मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांनी छापा टाकला. सपोनि शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पाचोड येथील सपोनि शरदचंद्र रोडगे व त्यांचे पथकासोबत संयुक्तिकरित्या कारवाई करून अवैधरित्या चालणा-या जुगार अड्यावर छापा मारला. हॉटेल निर्सगच्या पाठीमागे असलेल्या भालसिंगे यांची शेताची पाहणी … The post पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाचोड (ता. पैठण) परिसरातील हॉटेल निर्सगच्या पाठीमागे असलेल्या शेतातील मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांनी छापा टाकला. सपोनि शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पाचोड येथील सपोनि शरदचंद्र रोडगे व त्यांचे पथकासोबत संयुक्तिकरित्या कारवाई करून अवैधरित्या चालणा-या जुगार अड्यावर छापा मारला. हॉटेल निर्सगच्या पाठीमागे असलेल्या भालसिंगे यांची शेताची पाहणी व पडताळणी केली. यावेळी परिसरातील काही अंतरावर दुचाकी वाहने पार्किग केलेली दिसुन आली. दरम्यान शेतातील मोसंबीच्या बागेत घेराव टाकुन छापा टाकला असता झाडाखालील झोपडीमध्ये जुगार खेळतांना दिसुन आले. पोलीसांनी अचानकच्या कारवाईने या जुगार खेळणारांची धांदल उडाली. यातील काही व्यक्ती मिळेल त्या रस्त्याने अंधाराचा फायद्या घेवुन सैरावैर पळत सुटले. परंतु तरीही पोलीस पथकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत प्रशांत रामप्रसाद सारडा (रा. यशवंतनगर, पैठण), संतोष मिट्टू काळे (रा. पाचोड), बालाजी संपतराव जाधव (रा. चापडगाव ता. घनसावंगी जि. जालना), शिवाजी कचरू नरवडे (रा. पाचोड), गोविंद सिताराम सावंत (रा. सिंदखेड ता. घनसावंगी जि. जालना), विष्णु सुभाष मस्कर (रा. अंबड, जालना), विनोद बबनराव खाडे (रा. यशोदिपनगर, जालना), आदेश दिलीप राठोड (रा. लालवाडीतांडा अंबड), कल्याण गणपत गवळी (रा. सौंदलगाव ता. अंबड), दिलीप रोहीदास राठोड (रा. राहुवाडी, ता. अंबड), गजानन भाऊसाहेब भुमरे (रा. पाचोड), अजय शिवाजी डुकळे (रा. पाचोड), पंकज सुभाष माळोदे (रा. पाचोड) असे १३ जुगारी ताब्यात घेतले.
१ लाख ४७ हजार २१० नगदी रुपये सह दोन दुचाकी वाहने, मोबाईल फोन, पत्ताचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असे एकुण ४ लाख २२ हजार २१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे हे करित आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांचे विशेष पथकातील स.पो.नि. सुदाम सिरसाठ, पोलीस अंमलदार नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापसे, तसेच पो.स्टे. पाचोड सपोनि शरदचंद्र रोडगे, पोलीस अंमलदार अण्णासाहेव गव्हाणे, फेरोज बर्डे, पवन चव्हाण, राधकिसन सदाफुले, विलास काकडे, यांनी केली.
Latest Marathi News पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.