बीड : माजलगाव येथील पोलिस ठाण्यासमोर मनोरुग्णाची दगडफेक

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात आज (दि.९) एका मनोरूग्णाने धिंगाणा घालत दगडफेक केली. या घटनेमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. पूर्ण रस्ता चक्काजाम झाला. पोलिस ठाण्यात एकच पोलिस कर्मचारी हजर असल्याने पोलिसांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले. एक मनोरूग्ण युवक आज (दि.९) माजलगाव शहर पोलिस ठाण्यासमोर आला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात दगडफेक … The post बीड : माजलगाव येथील पोलिस ठाण्यासमोर मनोरुग्णाची दगडफेक appeared first on पुढारी.

बीड : माजलगाव येथील पोलिस ठाण्यासमोर मनोरुग्णाची दगडफेक

माजलगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात आज (दि.९) एका मनोरूग्णाने धिंगाणा घालत दगडफेक केली. या घटनेमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. पूर्ण रस्ता चक्काजाम झाला. पोलिस ठाण्यात एकच पोलिस कर्मचारी हजर असल्याने पोलिसांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले.
एक मनोरूग्ण युवक आज (दि.९) माजलगाव शहर पोलिस ठाण्यासमोर आला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात दगडफेक करायला सुरूवात केली. दीड तास सुरू असलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे वाहनांची कोंडी झाली. पोलिस ठाण्यात एकच पोलिस कर्मचारी हजर असल्याने पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पोलिस ठाण्याच्या परिसरात झालेल्या या घटनेवेळी एकही पोलिस कर्मचारी तेथे न आल्याने पोलिसांची दहशत कमी झाल्याची चर्चा शहरवासियांमध्ये होती. काही वेळाने  नागरिकांनी एकत्र येत शेवटी त्या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
हेही वाचा :

भंडारा : रानडुकरांची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू
धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक
चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

Latest Marathi News बीड : माजलगाव येथील पोलिस ठाण्यासमोर मनोरुग्णाची दगडफेक Brought to You By : Bharat Live News Media.