भंडारा : रानडुकरांची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : धावत्या दुचाकीला रानडुकराने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचारादरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. सदर घटना सॅनफ्लॅग कंपनीजवळच्या बायपास पुलावर काल (८ एप्रिल) मध्यरात्री ११.१५ च्या दरम्यान घडली. समीर हा रायपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. जवळच्या नातेवाइकांकडे … The post भंडारा : रानडुकरांची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

भंडारा : रानडुकरांची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : धावत्या दुचाकीला रानडुकराने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचारादरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. सदर घटना सॅनफ्लॅग कंपनीजवळच्या बायपास पुलावर काल (८ एप्रिल) मध्यरात्री ११.१५ च्या दरम्यान घडली.
समीर हा रायपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. जवळच्या नातेवाइकांकडे लग्न असल्याने तो काल रात्री रायपूर येथून रेल्वेने आला होता. रेल्वे स्टेशनवर कुणाल वाघमारे याने त्याला सोबत घेतले. दरम्यान, एकलारीला न जाता ते दोघेही भंडाऱ्याला मामाकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, बायपास पुलावर रानडुकरांचा कळप अचानक रस्त्यावर धावत सुटला व दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार व त्याचा सोबती रस्त्यावर कोसळले. दरम्यान, समीर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ भंडारा येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.
पण, दुखापत गंभीर असल्याने त्याला शासकीय दवाखान्यात भरती करताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून, पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व पोलिस हवालदार नितीन भालाधरे तपास करीत आहेत.
Latest Marathi News भंडारा : रानडुकरांची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.