‘तुम्ही प्रेमाने बोललात तर प्रेमाने बोलू, जर संघर्षाची भाषा केली…’ केदार साठेंचा नाव न घेता रामदास कदम यांना इशारा

दापोली; पुढारी वृतसेवा : माजी मंत्री रामदास कदम यांनी नुकतेच एका मुलाखतीत दापोलीतील भाजप पदाधिकऱ्याने आपल्या मुलाच्या विरोधात काम केलं असे वक्तव्य केले. भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी कदम यांनी आज भाजपच्या मेळाव्यात या व्यक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. साठे बोलताना म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालखंडात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता विकासापासून वंचित राहिला. आणि … The post ‘तुम्ही प्रेमाने बोललात तर प्रेमाने बोलू, जर संघर्षाची भाषा केली…’ केदार साठेंचा नाव न घेता रामदास कदम यांना इशारा appeared first on पुढारी.
‘तुम्ही प्रेमाने बोललात तर प्रेमाने बोलू, जर संघर्षाची भाषा केली…’ केदार साठेंचा नाव न घेता रामदास कदम यांना इशारा

दापोली; Bharat Live News Media वृतसेवा : माजी मंत्री रामदास कदम यांनी नुकतेच एका मुलाखतीत दापोलीतील भाजप पदाधिकऱ्याने आपल्या मुलाच्या विरोधात काम केलं असे वक्तव्य केले. भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी कदम यांनी आज भाजपच्या मेळाव्यात या व्यक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
साठे बोलताना म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालखंडात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता विकासापासून वंचित राहिला. आणि हे आम्ही समोरासमोर बसून सांगितलं आहे. २०१४ पासून भारतीय जनता पार्टीची सातत्यानं कुचेष्टा केली गेली म्हणून आम्ही विरोधात काम केलं. असे केदार साठे यांनी भाजप मेळाव्यात ठणकावून सांगितले.
 ज्याच्या खात्यातून तुम्ही विकास निधी आणता त्याच खात्याच्या मंत्र्याला कोण तो रवींद्र चव्हाण असा एकेरी उल्लेख करता याला आम्ही विरोध केला, हा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने बाळगणे गुन्हा आहे का? असा सवाल साठे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही प्रेमाने बोललात तर आम्ही प्रेमाने बोलू आणि संघर्षाची भाषा केलीत तर तेही करू. दापोलीत भारतीय जनता पार्टीचे ३० ते ३५ हजर इतके मताधिक्य वाढले आहे तर विधानसभा निवडणुकीत हा आकडा चाळिशी पार करेल . त्यामुळे कुणीही भारतीय जनता पार्टीला हलक्यात घेऊ नका असा एक प्रकारे इशारा केदार साठे यांनी या मेळाव्यातून गर्दीच्या माध्यमातून रामदास कदम यांना दिला आहे. या पुढे कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. असे देखील साठे यांनी रामदास कदम यांना ठणकावले .
Latest Marathi News ‘तुम्ही प्रेमाने बोललात तर प्रेमाने बोलू, जर संघर्षाची भाषा केली…’ केदार साठेंचा नाव न घेता रामदास कदम यांना इशारा Brought to You By : Bharat Live News Media.