समोरच्या उमेदवाराकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही : अदिती तटकरे यांची अनंत गीतेंवर टीका
दापोली; प्रवीण शिंदे : ज्यांना या मतदार संघाने पाच वेळा निवडून दिलं त्या अनंत गीतेंनी एका पराभवाने जनतेकडे पाठ फिरवली. समोरच्या उमेदवाराकडे विकासाचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही अशी टीका मंत्री अदिती तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केली. दापोली येथे भाजप पदाधिकारी मेळाव्यात त्या बोलत होत्या. एखाद्याच्या सुखात जाता आले नाही तरी चालेल पण एखाद्याच्या दुःखात गेले पाहिजे ही एका लोक प्रतिनिधीची निश्चित जबाबदारी असते अशा शब्दात तटकरे यांनी गितेंना या वेळी सुनावले.
आजच्या या महायुतीच्या मेळाव्यातून रायगड लोकसभा युतीचे उमेदवार यांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. कारण समोरच्या उमेदवाराकडे कोणताही विकासाचा मुद्दा राहिला नाही. अवजड उद्योग मंत्री असताना अनंत गीते यांनी मतदार संघात रायगडमध्ये एकही अवजड किंवा उद्योग आणला नाही अशी टीका मंत्री अदिती तटकरे यांनी दापोली येथे माजी मंत्री आणि आघाडीचे उमेदवार यांच्यावर केली. महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षात केलेलं काम सर्वांसमोर आहे. त्यामुळे समोरच्या उमेदवाराकडे विकासाबाबत सांगण्यासारख काहीच नाही. हे दर पाच वर्षांनी येतात, यांचा पंचवार्षिक दौरा सुरू झालेला आहे. हे २०१४ ला आले होते त्यानंतर २०१९ ला आले मात्र मध्यंतरीच्या काळात आलेली आपत्ती चक्रीवादळ , कोविड हे मात्र त्यांना दिसलं नाही अशी टीका तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केली. . तर आगामी काळात निवडणुकीच्या दरम्यान हे सगळे मुद्दे आपण विचारत घेऊ असे देखील सांगितले . समोरच्या उमेदवाराच्या कार्य काळात एकही विकास काम सांगण्यासारखे नाही म्हणून दुसऱ्यावर टीका करून आपल्याला कुणी मत देते का हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास झालेला आहे त्याला अधिक वेगवान करण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे.
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष अतुल कालसेकर,माजी आमदार सूर्यकांत दळवी, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, राष्ट्रवादी सरचिटणीस संदीप राजपुरे, माजी आमदार विनय नातू , साधना बोत्रे, दापोली तालुका अध्यक्ष संजय सावंत, श्रीराम ईदाते, स्मिता जावकर, अक्षय फाटक, रुपेश बेलोसे, आदी उपस्थित होते.
Latest Marathi News समोरच्या उमेदवाराकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही : अदिती तटकरे यांची अनंत गीतेंवर टीका Brought to You By : Bharat Live News Media.