कोल्हापूर : तळसंदेजवळ तवेरा-ट्रकची समोरासमोर धडक, चालक जागीच ठार

किणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रक आणि तवेरा मोटार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारचाकी चालक जागीच ठार झाला. विकास बुध्दास जाधव (रा. तळसंदे ता. हातकणंगले) असे मृत चालकाचे नाव आहे. वाठार वारणानगर रस्त्यावर तळसंदे येथे रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या अपघाताची नोंद रात्री उशिरा वडगाव पोलीसांत झाली.
तळसंदे येथील विकास जाधव हा तवेरा मोटार (एम. एच-०९ एच-यु-२५५३) घेऊन वारणानगरकडून तळसंदेकडे येत होता. तळसंदे गावच्या पश्चिमेस सिमा बायोटेक जवळच्या वळणावर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. याचवेळी वारणानगरच्या दिशेने ट्रक ( के. ए. २८- डी-१३१७) निघाला होता. या ट्रकवर ताबा सुटलेली तवेरा जाऊन जोराने धडकली. या भिषण धडकेत विकास जागीच ठार झाला. तवेरा गाडी ट्रकच्या समोरील बाजूमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. गाडीत अन्य कोणी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. विकास याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.या अपघाताची नोंद रात्री उशिरा वडगाव पोलिसांत झाली .
Latest Marathi News कोल्हापूर : तळसंदेजवळ तवेरा-ट्रकची समोरासमोर धडक, चालक जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.
