यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकून 17 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहीले आहे. रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये कुणाल कृष्णराव जानकर, रामराम सवाई पवार व वैशाली संजय देशमुख यांचा समावेश … The post यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकून 17 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहीले आहे. रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये कुणाल कृष्णराव जानकर, रामराम सवाई पवार व वैशाली संजय देशमुख यांचा समावेश आहे. या तिनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. निवडणूक रिंगणात असलेले 17 उमेदवार, त्यांच्या पक्षाचे नाव व त्यांना देण्यात आलेले निवडणूक चिन्ह खालील प्रमाणे आहे.
1) राजश्रीताई हेमंत पाटील (महल्ले), पक्ष शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण
2) संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चिन्ह मशाल
3) हरीसिंग (हरीभाऊ) नासरू राठोड, पक्ष बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती
4) अनिल जयराम राठोड, पक्ष समनक जनता पार्टी, चिन्ह जहाज
5) अमोल कोमावार, पक्ष हिंद राष्ट्रसंघ, चिन्ह वाळूचे घड्याळ
6) उत्तम ओमकार इंगोले, पक्ष पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), चिन्ह फळांची टोपली
7) धरम दिलीपसिंग ठाकूर, पक्ष सन्मान राजकीय पक्ष, चिन्ह बॅटरी टॅार्च
8) डॅा.अर्जुनकुमार सिताराम राठोड, अपक्ष, चिन्ह ग्रामोफोन
9) प्रा.किसन रामराव अंबुरे, अपक्ष, चिन्ह तुतारी
10) गोकुळ प्रेमदास चव्हाण, अपक्ष, चिन्ह सितार
11) दिक्षांत नामदेव सवाईकर, अपक्ष, चिन्ह एअर कंडिशनल
12) नुर अली महेबुब अली शाह, अपक्ष, चिन्ह ॲटोरिक्षा
13) मनोज महादेवराव गेडाम, अपक्ष, चिन्ह हेल्मेट
14) रामदास बाजीराव घोडाम, अपक्ष, चिन्ह ऊस शेतकरी
15) विनोद पंजाबराव नंदागवळी, अपक्ष, चिन्ह स्पॅनर
16) संगीता दिनेश चव्हाण, अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर
17) संदीप संपत शिंदे, अपक्ष, चिन्ह शिट्टी
Latest Marathi News यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात Brought to You By : Bharat Live News Media.