संजय शिरसाट शिंदेसेनेचे सक्षम उमेदवार ठरतील : संजय केनेकर
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगरवर दावा केला होता. परंतु, हा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाचा आहे. सेनेकडे अनेक सक्षम उमेदवार असून त्यात जर आमदार संजय शिरसाट यांना उमेदवारी दिलीच. तर ते सक्षम उमेदवार ठरू शकतील. शिवाय, एक दलित चेहरा दिल्याचा संदेश देखील जाईल, असे भाजपचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर गुरुवारी (दि. ४) म्हणाले. Lok Sabha Election 2024
राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरलेला नाही. महायुतीकडून लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण राहील याबद्दल भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांना पत्रकारांनी विचारले. तेव्हा ते म्हणाले की, महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदार संघ शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आला आहे. हा मतदार संघ यंदा भाजपकडे राहावा, अशी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. एवढेच नव्हे तर मागील तीन वर्षात भाजपने या मतदार संघातील गावे पिंजून काढली आहेत. नागरिकही येथून कमळ फुलविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आमचे प्रयत्न अद्याप संपलेले नाही. Lok Sabha Election 2024
दरम्यान, शिंदे गटाकडून लोकसभेसाठी सक्षम उमेदवार मिळवा, अशी अपेक्षा होत आहे. तसे अनेक उमेदवार त्यांच्याकडे आहेत. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट हे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार ठरू शकतील. ते पश्चिम मतदार संघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून ते आर्थिक दृष्टया देखील सक्षम आहेत. वंचित आणि एमआयएमला सोबत घेण्याची कला देखील त्यांच्याकडे आहे. मतदारांमध्ये त्यांची क्रेझ असल्याने त्यांना सर्वस्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळेल. भाजप त्यांनाच काय तर शिंदे सेनेकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल. त्यास संपूर्ण सहकार्य करणार आहे. परंतु, जर शिरसाट यांना उमेदवारी दिली. तर एक दलित खासदार लोकसभेवर पाठवता येईल, असेही केनेकर म्हणाले.
हेही वाचा
Sanjay Shirsat | युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी
Maharashtra Politicl Crisis : अजित पवारांमुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी; संजय शिरसाट म्हणाले…
Maharashtra Politics | जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, संजय शिरसाट यांचा दावा
Latest Marathi News संजय शिरसाट शिंदेसेनेचे सक्षम उमेदवार ठरतील : संजय केनेकर Brought to You By : Bharat Live News Media.