भाजपच्या अर्चना पाटील राष्ट्रवादीत; खा. ओमराजेंविरोधात रिंगणात उतरणार
धाराशिव, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी आज (दि.४) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश केला. लागलीच महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आता पारंपरिक लढत होणार आहे.
२०१४ मध्ये या मतदारसंघात तत्कालिन खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केला होता. तेव्हा ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार होते. त्या निवडणुकीतही त्यांनी डॉ. पाटील यांच्याविरोधात आक्रमक प्रचार केला होता. पुढे २०१९ मध्ये तर आ. पाटील हेच लोकसभेचे उमेदवार झाले. त्यांच्याविरोधात आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीकडून दंड थोपटले; मात्र आ. पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर राणाजगजितसिंह पाटील यांचे कुटुंबच भाजपमध्ये गेले.
यंदाच्या लोकसभेसाठी खा.निंबाळकर यांची उमेदवार दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झाली आहे. महायुतीकडून मात्र जागा कोणाला सुटणार व उमेदवार कोण असणार यावरच खल झाला. दररोज वेगवेगळी नावे चर्चेत येत होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटल्याने तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरु होता. या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरुन तयारी सुरु केली होतीे. त्यांची मतदारसंघात एक फेरीही पूर्ण केली होती. प्रत्यक्षात त्यांचे नाव मागे पडले. शिवसेनेकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक होते. ही जागा शिवसेनेची असल्याने आपल्याला उमेदवार मिळेल, असा आत्मविश्वास त्यांना होता. प्रत्यक्षात मात्र अजित पवारांच्या गटाने ही जागा पटकावली आहे. तसेच महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. अर्चना पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. लेडीज क्लबच्या या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामही सातत्याने सुरु असते. त्यांच्या प्रवेशानंतर भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली.
हेही वाचा :
Sambhaji Raje – Sanjay Mandlik : संभाजीराजे – संजय मंडलिक यांच्या भेटीने चर्चांना उधाण
Ambadas Danve : भाजपने शिंदे, पवारांना ताटाखालचे मांजर बनविले: अंबादास दानवे
..तर आज दुष्काळाची तीव्रता नसती; जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
Latest Marathi News भाजपच्या अर्चना पाटील राष्ट्रवादीत; खा. ओमराजेंविरोधात रिंगणात उतरणार Brought to You By : Bharat Live News Media.