निवडणुकीत माझे नाव, फोटो वापरू नका : मनोज जरांगे यांची तंबी
वडीगोद्री : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत मी कोणताही उमेदवार दिलेला नसून माझा कुणालाही पाठिंबा नाही. मराठा आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊ नये. तसेच माझा फोटोही कुणी वापरू नये, असे मनोज जरांगे यांनी राजकीय पक्ष व उमेदवारांना सुनावले आहे. जालना येथे ते आले असता पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
Lok Sabha Election : काँग्रेसला 5 जागा सोडाव्या लागणार; ठाकरे, पवार गट मारणार बाजी
जुन्नरचे नाव शिवनेरच; पुरावे सापडले : तालुक्याचे नाव शिवनेर करण्याची जनतेची मागणी
आयपीएस अधिकार्यांच्या घरी पोलीस शिपाई घरगडी
मराठा समाजाने एकही उमेदवार दिला नाही. एकाने वापरला तर बाकीचे पक्षसुद्धा वापरतील. राजकीय आंदोलनाचा फायदा घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्यासमोर झालेल्या घोषणाबाजी प्रकरणी कार्यकर्त्यांवरील गुन्ह्याचा त्यांनी निषेध केला.
Latest Marathi News निवडणुकीत माझे नाव, फोटो वापरू नका : मनोज जरांगे यांची तंबी Brought to You By : Bharat Live News Media.