विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांमुळे अपघात; पाषाण-सूस रस्त्यावरील समस्या
बाणेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पाषाण-सूस रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाणार्या वाहनांमुळे अनेकदा वरदायिनी सोसायटी ते महामार्गावरील उड्डाणपुलादरम्यान अपघात होत आहेत. विरुद्ध दिशेने जाणार्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाषाण-सूस रस्त्यावरून बाणेर किंवा सेवा रस्त्याने मुंबईकडे जाणारा मार्ग उड्डाणपुलाच्या आलीकडे वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत यासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांना उड्डाणपूल ओलांडल्यावर वळून परत यावे लागते व हे अंतर अंदाजे एक किलो मीटरपेक्षा जास्त आहे.
एवढे अंतर जाऊन येण्यापेक्षा व लागणारा वेळ वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक दुचाकी बरोबरच चारचाकी मोठी वाहने घेऊन वरदायिनी सोसायटीपासून थेट विरुद्ध दिशेने जातात. यामुळे सूसकडून येणार्या वाहनांना अडथळा निर्माण होतो, तसेच अपघातही होतात. स्थानिक रहिवाशांनी याविरुद्ध तक्रारी केल्या असून, वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जाते. परंतु, वेळ व अंतर वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक स्वतःसह इतरांचे जीव धोक्यात घालून चुकीच्या दिशेने प्रवास करतात. यामुळे पादचार्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गाकडे जाण्यासाठी नियोजन करा
सूस खंडीत बनवण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे एक किलोमीटरचा वळसा घालून येण्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाषाणकडून येणा-या वाहनाला महामार्गावर उतरण्याची संधीच नसल्याने, नागरिक जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत. या ठिकाणी बाणेरकडे व महामार्गाकडे जाण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उलट दिशेने जाणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभागाकडून दोन पोलिस कर्मचार्यांसह दोन वॉर्डनची नियुक्ती या भागात केली आहे. पुलाच्या अलीकडे पूर्वीप्रमाणे वळण घेण्यासाठी रस्ता मोकळा करण्यासह तेथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे
– एस. एस. पठाण, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक विभाग
हेही वाचा
ईटीबीपीएस माध्यमातून होणार जिल्ह्यातील मतदान; काय आहे ईटीबीपीएस?
अन् व्हिडीओवाला पोलिस निलंबित; चिरीमिरी घेताना कॅमेर्यात झाला होता कैद
रुग्णालय तयार; सुविधांची प्रतीक्षाच : लोहगाव रुग्णालयाची अवस्था
Latest Marathi News विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांमुळे अपघात; पाषाण-सूस रस्त्यावरील समस्या Brought to You By : Bharat Live News Media.