कोगनोळी नाक्यावर ३ लाखाची रोकड जप्त; निवडणूक विभागाची कारवाई
निपाणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर मंगळवारी रात्री ३ लाखांची रोखड निवडणूक विभागाने जप्त केली. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिसऱ्यांदा निपाणी ग्रामीण पोलीस आणि निवडणूक प्रशासनाने ही कारवाई केली असून आत्तापर्यंत २१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोगनोळी टोलनाका येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका स्थापित करण्यात आला आहे. त्यानुसार शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील रहिवाशी नितीन कांबळे हे आपल्या कारमधून सीमा तपासणी नाका पार करून निपाणीच्या दिशेने जात होते. यावेळी तपासणी नाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता कांबळे यांच्याकडे विना कागदपत्राविना ३ लाख रुपये आढळून आले. त्यानुसार घटनास्थळी तहसीलदार एम. एन. बळीगार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी यांनी भेट देऊन मिळालेल्या रकमेबाबतच्या कागदपत्रांची चाचपणी केली. मात्र कांबळे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रकमेबाबत कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने मिळालेली रक्कम जप्त करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.ए.कंबार, एस.ए.पाटील, हवलदार विनोद असोदे, सौंदलगा ग्रामपंचायतीचे सचिव रामा वाळके यांच्यासह तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा :
केंद्रात कितीवेळा कोणाची सत्ता
काँग्रेसचे ‘एक तीर दो निशाने’
माजी मुख्यमंत्र्यांंसह मंत्र्यांची मुले भिडणार
Latest Marathi News कोगनोळी नाक्यावर ३ लाखाची रोकड जप्त; निवडणूक विभागाची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.