करीना, क्रिती, तब्बूची धमाल; विकेंडलाही कमाईचा धुमाकूळ

करीना, क्रिती, तब्बूची धमाल; विकेंडलाही कमाईचा धुमाकूळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : करीना कपूर, कृती सेनॉन आणि तब्बू स्टारर चित्रपट ‘क्रू’ शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर अनेक चित्रपट समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवत आहे. प्रेक्षकही चित्रपटांना दाद देत तिन्ही (Crew Box Office Collection) दिग्गज अभिनेत्रींची कॉमेडी एन्जॉय करत आहे. चित्रपटगृहात ‘क्रू’ची एन्ट्री झाल्यानंतर ते आतापर्यंत कमाईचा धुमाकूळ घालत आहे. (Crew Box Office Collection )
चित्रपटाचा ओपनिंग वीकेंडचा प्रवास दमदार कलेक्शन सोबत पूर्ण केलं आहे. पहिल्या आठवड्यात ३२.६० कोटी रुपयांचे कलेक्शन केलेल्या ‘क्रू’ची कमाई रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी १० कोटींहून अधिक होती. पुढील दोन दिवस देखील चित्रपटाच्या कमाईत वाढ होत राहिली. तगड्या कलेक्शन सोबत पहिला आठवडा ३२.६० कोटींची कमाई करून गेला.
‘क्रू’ने एका दिवसात दमदार कमाई सोबत सिद्ध केलं की, हा चित्रपट दीर्घकाळ चालेल. बॉक्स ऑफिसच्या अनुमानानुसार, ‘क्रू’ने चौथ्या दिवशी ४.५ कोटी अधिक ते ५ कोटींदरम्यान, कलेक्शन केलं आहे. सोबतचं ४ दिवसात चित्रपटाची कमाई ३७ कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली.
‘क्रू’ ने पहिल्या तीन दिवसांत इंडियन बॉक्स ऑफिसवर जवळपास २९.२५ कोटींचे कलेक्शन केलं आहे. रविवारी चित्रपटाने जवळपास १०.५ कोटींचे कलेक्शन केलं आहे. सोमवारी कलेक्शनमध्ये घसरण झाली. चित्रपटाने चार दिवसात इंडियन बॉक्स ऑफिसवर ३४ कोटींचे कलेक्शन केलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 
A post shared by TIPS (@tips)

Latest Marathi News करीना, क्रिती, तब्बूची धमाल; विकेंडलाही कमाईचा धुमाकूळ Brought to You By : Bharat Live News Media.