इस्रायलचा सिरियातील इराणच्या दुतावासावर बॉम्बहल्ला; ८ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलने सिरियातील इराणच्या दुतावासावर सोमवारी (दि.२) बॉम्बहल्ला केला. या ह्ल्ल्यात इराणच्या सर्वोच्च कमांडरसह ८ लष्करी सल्लागारांचा मृत्यू झाला. हल्ल्यात इराणचे दमास्कसमधील राजदूत होसेन अकबरी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती इराणच्या नूर न्यूज एजन्सीने दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सीरियाच्या राजधानीतील इराणच्या दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ८ जणांचा मृत्यू … The post इस्रायलचा सिरियातील इराणच्या दुतावासावर बॉम्बहल्ला; ८ ठार appeared first on पुढारी.

इस्रायलचा सिरियातील इराणच्या दुतावासावर बॉम्बहल्ला; ८ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इस्रायलने सिरियातील इराणच्या दुतावासावर सोमवारी (दि.२) बॉम्बहल्ला केला. या ह्ल्ल्यात इराणच्या सर्वोच्च कमांडरसह ८ लष्करी सल्लागारांचा मृत्यू झाला. हल्ल्यात इराणचे दमास्कसमधील राजदूत होसेन अकबरी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती इराणच्या नूर न्यूज एजन्सीने दिली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात सीरियाच्या राजधानीतील इराणच्या दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. सीरियाची राज्य वृत्तसंस्था SANA ने सांगितले की, ‘इस्रायली हल्ल्यात दमास्कसजवळील माजेह येथील इराणी वाणिज्य दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले.’ या हल्ल्यात इराणचा कमांडर मोहम्मद रजा जाहेदी यांच्या मृत्यूची बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. स्थानिक मीडियाने एका वरिष्ठ कमांडरसह इमारतीत आठ लोक ठार झाल्याचे सांगितले आहे. तसेच दोन नागरिक आणि हिजबुल्लाहचा एक सदस्य हुसेन युसूफ यांचाही मृत्यू झाला आहे.
दूतावास जवळची इमारत जमीनदोस्त
सध्या यावर इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ७ ऑक्टोबरपासून हमास विरुद्ध गाझा युद्ध सुरू असताना, इस्रायलने इराणशी संबंधित दहशतवादी गटांवर हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यात दूतावास जवळील एक इमारत जमीनदोस्त झाली. दमास्कसमधील हल्ल्यांमध्ये संकुलातील एक इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे इराणी माध्यमांनी सांगितले. मात्र, राजदूताला कोणतीही इजा झाली नाही.
Latest Marathi News इस्रायलचा सिरियातील इराणच्या दुतावासावर बॉम्बहल्ला; ८ ठार Brought to You By : Bharat Live News Media.