नांदेड: कासराळी येथे सख्ख्या भावाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
राजेंद्र कांबळे
बिलोली: कासराळी येथे सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या दोषी आरोपीस आज (दि.१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर वेगवेगळ्या गुन्ह्यात ६० हजार दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा ६ महिन्यांचा कारावास व १० हजार दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा ३ महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली. हणमंत इबीतवार असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायधीश दिनेश. ए. कोठलीकर यांनी ही शिक्षा ठोठावली. Nanded News
बिलोली तालुक्यातील मौ. कासराळी येथील दोन सख्ख्या भावांत भांडणे होत होती. मृत लक्ष्मण इबीतवार व त्याची पत्नी पिराबाई हे दोघे घरी होते. यावेळी आरोपी हणमंत इबीतवार यांने लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हणमंत आणि त्याची पत्नी अंशाबाई यांनी मृत लक्ष्मण याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. यात लक्ष्मणचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ५ नोव्हेंबर २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणी पत्नी पिराबाई लक्ष्मण इबीतवार हिने बिलोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. Nanded News
तत्कालीन सह्ययक पोलीस निरीक्षक राम केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात सरकार कडून एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सह्ययक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप कुंडलवाडीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बिलोली जिल्हा न्यायाधीश तथा सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आरोपी हणमंत इबीतवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल मेहबूब ए. शेख यांनी काम पाहिले.
हेही वाचा
नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी
नांदेड : २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाला अटक
नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत डोंगरकडा फाटाच्या तरुणाचा मृत्यू
Latest Marathi News नांदेड: कासराळी येथे सख्ख्या भावाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.