वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, रावेरमधून ब्राह्मणे

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क रावेर लोकसभा मतदारसंघातून संजय पंडीत ब्राह्मणे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली असून ते रावेरमध्ये वंचितच्या तिकीटावर लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. २०१९ मध्ये भुसावळ येथील विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची आशा असतांना ती मिळाली नसल्याने संजय ब्राम्हणे यांनी अपक्ष उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यापूर्वीच्या निवडणूकीमध्ये त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी … The post वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, रावेरमधून ब्राह्मणे appeared first on पुढारी.

वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, रावेरमधून ब्राह्मणे

जळगाव : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क
रावेर लोकसभा मतदारसंघातून संजय पंडीत ब्राह्मणे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली असून ते रावेरमध्ये वंचितच्या तिकीटावर लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत.
२०१९ मध्ये भुसावळ येथील विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची आशा असतांना ती मिळाली नसल्याने संजय ब्राम्हणे यांनी अपक्ष उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यापूर्वीच्या निवडणूकीमध्ये त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर यंदा मात्र रावेर मतदारसंघातून त्यांना वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रावेरमधून संधी मिळाली आहे. इंजि. संजय पंडित ब्राम्हणे यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले असून अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे पदविका व पदवी घेतली आहे. “बदलांची सुरूवात ही नेहमी स्वतःपासून होते” असे त्यांचे म्हणणे आहे.
रावेरमधून भाजप पक्षाने रक्षा खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा राष्ट्रवादी शरद गटाकडे असली तरी अद्याप मात्र त्यांचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून तपास शोधमोहीम सुरु असून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its second list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. pic.twitter.com/9TFe472Byw
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 31, 2024

Latest Marathi News वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, रावेरमधून ब्राह्मणे Brought to You By : Bharat Live News Media.