पटोले आंबेडकरांना म्हणाले, द्यायचा तर मग सर्वच जागी पाठिंबा द्या!
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन द्यायचेच आहे तर वंचित बहुजन आघाडीने सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही. साताऱ्याबाबत चर्चा नाही. कोणाचा कुणाशी संबंध आहे? ते योग्य वेळी सांगू अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
अकोल्यात रविवारी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केल्यावरून आज पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मविआच्या सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती. काल बैठक झाली. दिल्लीतून काय चर्चा झाली, ते आदेश देणार, त्याचे पालन करू, प्रकाश आंबेडकर यांना आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. त्यांना द्यायचे असेल, तर ते देऊ शकतात.
मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला व्यक्तिगत टॉर्चर केले जात आहे. हे काही बरोबर नाही, त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ असे स्पष्ट कतानाच रामटेकमध्ये आता रश्मी बर्वे विषय संपला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत ते नक्की निवडून येतील असा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा :
मविआतर्फे अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार; शरद पवारांच्या उपस्थित भरणार अर्ज
रामायण, गीता आणि… : केजरीवालांनी तिहार कारागृहात मागितल्या ‘या’ गोष्टी
अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भातून प्रचाराला करणार सुरूवात
Latest Marathi News पटोले आंबेडकरांना म्हणाले, द्यायचा तर मग सर्वच जागी पाठिंबा द्या! Brought to You By : Bharat Live News Media.