मतदार जनजागृतीसाठी शाळेत घुमणार ‘मै भारत हूँ’चा आवाज!

मतदार जनजागृतीसाठी शाळेत घुमणार ‘मै भारत हूँ’चा आवाज!

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा ‘उत्सव 100 टक्के मतदानाचा’ हा महोत्सव आजपासून 1 ते 3 एप्रिल या कालावधीत साजरा केला जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांंच्या निर्देशानुसार नगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार जनजागृतीसाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात शाळांमध्ये दोन गीते परिपाठावेळी मैदानावर, वर्गावर्गांमधून; शक्य झाल्यास माइक, स्पीकरवर ऐकवून, विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली जाणार आहेत.
वरील दोन्ही गीतांच्या चालीसाठी व्हिडिओच्या लिंक क्यूआर कोड स्वरूपात वितरित आलेल्या आहेत. संकल्पपत्रे विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून भरून घेतली जाणार आहेत. वरील कालावधीत सर्व उपक्रम शाळेमध्ये आयोजित करावयाचे असून सर्व उपक्रमांचे सर्व फोटो, व्हिडिओ, विविध लिंक्स, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा अहवाल 8 एप्रिलपर्यंत मागविला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार-निवडणूक प्रदीप पाटील, स्वीप समिती सदस्य उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागूल आदी परिश्रम घेत आहेत.

सोमवार, 1 एप्रिल : सामूहिक गीतगायन – मतदार साक्षरता गीत – ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’
मंगळवार 2 एप्रिल : सामूहिक गीतगायन – महाराष्ट्राचे पहिले निवडणूक गीत – ‘ये पुढे, मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर’
बुधवार 3 एप्रिल : संकल्प पत्रलेखन

महोत्सवात…
‘मेै भारत हूँ, हम भारत के मतदाता है,’ तसेच ‘ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर’, ही दोन गीते जिल्ह्यातील हजारो शाळांमधून समूहगीत गायनाच्याद्वारे लाखो विद्यार्थी सादर करणार आहेत. मतदार जनजागृतीच्या अधिकृत गीतांद्वारे स्वीप मोहीम जनमानसामध्ये पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
-अशोक कडूस, स्वीप नोडल अधिकारी

हेही वाचा

विद्यापीठात ठेकेदारांवर खिरापतीचा वर्षाव : अशोक तनपुरेंची तक्रार
नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची गळा चिरुन हत्या, शहर हादरलं
सांगलीच्या आखाड्यात ‘पाटील’की कोणाची?

Latest Marathi News मतदार जनजागृतीसाठी शाळेत घुमणार ‘मै भारत हूँ’चा आवाज! Brought to You By : Bharat Live News Media.